Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे –

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 1364 नवे रुग्ण आढळल्याने, 1 लाख 34 हजार 29 एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात

- Advertisement -

46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 3 हजार 167 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या 164 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 1 लाख 13 हजार 786 रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने 832 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 34 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 905 जण आज करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 71 हजार 641 वर पोहचली असून पैकी 57 हजार 914 जण करोनामुक्त झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजार 188 येवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या