कोविड अनुदानासाठीचे केंद्रीय पथक नाशकात; काय असेल प्रक्रिया?

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक |प्रतिनिधी Nashik

करोनामुळे मृत्यू (covid death) झालेल्यांच्या नातेवाईकांना शासनाकडून प्रत्येकी 50 हजार रूपयांचे अनुदान देण्यात येत आहे. या अनुदानाबाबत मनपा (NMC) स्तरावर होत असलेल्या कामाची तपासणी करण्यासाठी केंंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे त्रिसदस्यीय पथक दोन दिवसासाठी नाशिकमध्ये दाखल झाले असून ते जिल्हा रुग्णालयात (District Hospital) बसून सर्व कागदपत्रांची तपासणी करणार आहे…

महापालिका क्षेत्रात (NMC) दोन वर्षांत 4 हजार 105 नागरिकांचा करोनामुळे मृत्यू (Covid death) झाल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे. प्रत्यक्षात करोनामुळे बळी पडलेल्यांच्या वारसांना मिळणार्‍या सानुग्रह अनुदासाठी 10 हजार 120 अर्ज प्राप्त झाले आहेत , यातील 8, 791 अर्ज वैद्यकीय विभागाने मंजूर केले आहेत. तर 1047 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

करोनामुळे मृत्यू (Covid death) झालेल्या व्यक्तीची कागदपत्रे कुटुंबामधील अनेक व्यक्तींकडून अर्थसहाय्यासाठी सादर करण्यात आल्यानेच आकडा वाढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश (Supreme court order) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे.

त्यानुसार शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांच्या प्रधान आदेशांनुसार करोनाबळींच्या वारसांकडून महापालिकेने सानुग्रह अनुदानासाठी अर्ज मागविले होते. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात 8 हजार 899 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

सानुग्रह अनुदानाच्या मागणीसाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे (Health Department) प्राप्त झालेल्या 10 हजार 339 अजपैकिी 1047 अर्ज विविध कारणांमुळे फेटाळण्यात आले आहेत.

240 अर्जानी मागणीवर पुनर्विचारासाठी अर्ज दाखल केले असून, वैद्यकीय विभागाकडून (Health Department) सुनावणीची प्रक्रिया राबविली जात असली तरी संबंधित अर्जधारक सुनावणीला येत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेकडून (NMC) शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार काम सुरू आहे. आता केंद्र सरकारचे पथक (Central Government) महापालिकेत येऊन वैद्यकिय विभागाकडून काय माहिती घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *