Thursday, April 25, 2024
Homeनगरकरोनाचा फटका : कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चालक आर्थिक अडचणीत

करोनाचा फटका : कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चालक आर्थिक अडचणीत

कुकाणा (वार्ताहर) – गत दीड वर्षापासून करोनामुळे नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील संगणक संस्था बंद आहेत. परिणामी हे संस्थाचालक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. त्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी होत असून त्याचबरोबर बंद असलेल्या संस्था सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी कुकाणाचे संगणक संस्थेचे संचालक निसार सय्यद यांनी केली आहे.

एक ते दीड वर्षापासून कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट बंद आहे. सदर संस्थेतून हजारो विद्यार्थी संगणक कोर्सेस करून शासनाच्या अनेक विभागात कार्यरत आहेत.

- Advertisement -

कॉम्प्युटर इन्स्टीट्युट चालवणारे अनेक कुटुंबीय याच व्यवसायावर अवलंबून आहेत. या संस्थांना शासन कोणतेही अनुदान देत नाही. काहींच्या संस्था भाडेतत्त्वावर आहेत त्यांचे भाडे व वीज बिल थकलेआहे. बरेच संस्थाचालकांचे संसार बिकट परिस्थितीत आहेत.

शासन मान्य असलेल्या संस्था उघडण्यासाठी परवानगी द्यावी जेणे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सुलभ जाईल. संस्थेवर पोट असणार्‍या कुटुंबाचा जाणीवपूर्वक विचार करावा अशी अपेक्षाही निसार सय्यद व इतरांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या