Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशफ्रान्समध्ये करोनाचा कहर! तिसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा

फ्रान्समध्ये करोनाचा कहर! तिसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा

दिल्ली | Delhi

करोनाचे संकट अद्यापही कायम असून जगभरातील काही देशांमधील परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे. काही देश करोनातून बाहेर पडत पुन्हा एकदा अर्थव्यवस्था रुळावर आणत सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच अन्य काही देशांमध्ये अद्यापही लॉकडाउन सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

- Advertisement -

दरम्यान, फ्रान्समध्ये करोनाचा कहर कमी होताना दिसत नाही. फ्रान्समध्ये करोनाची तिसरी लाट आली असून मोठ्या संख्येने लोक अडचणीत येताना दिसत आहे. करोना बाधितांची अनियंत्रित आकडेवारी पाहता फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशभरात लॉकडाऊन लागू केलं आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कोरनाचा धोका लक्षात घेता देशभरात ४ आठवड्यांसाठी लॉकडाउन जाहीर केला आहे. बुधवारी, देशव्यापी लॉकडाऊनचे आदेश देताना अध्यक्ष मॅक्रॉन यांनी शाळा कमीत कमी तीन आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, “आम्ही आता ठोस पावले उचलली नाहीत तर करोनावरील आपला ताबा सुटेल.” फ्रान्समध्ये देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान केवळ आवश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. ऑफिसमध्ये जाण्याऐवजी लोक वर्क फ्रॉम होम करतील. आणि या दरम्यान १० किमीच्या पुढे जाण्यास मनाई असणार आहे. तसेच “लॉकडाऊन दरम्यान करोना लसीकरणाचे काम वेगाने केले जाईल आणि उन्हाळ्याच्या अखेरीस सरकार १८ वर्षांवरील सर्व लोकांना करोना लस लागू करेल. आम्ही हे निर्णय लांबणीवर लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण आता हे निर्णय काटेकोरपणे घेण्याची वेळ आली आहे,” असे अध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले.

तसेच ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांच्यासमोर त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतलं सगळ्यात मोठं संकट उभं झालंय. एकीकडे त्यांच्या देशाच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी राजीनामे दिले आहेत, तर दुसरीकडे ब्राझीलमध्ये करोनामुळे झालेल्या एका दिवसांतल्या मृत्यूंची सर्वोच्च संख्या नोंदवली गेली आहे. लष्कराच्या तिन्ही प्रमुखांनी दिलेले राजीनामे हे बोल्सोनारो यांच्याविरोधात केलेलं आंदोलन म्हणून पाहिलं जात आहे. लष्करावर नियंत्रण मिळवण्याच्या बोल्सोनारो यांच्या प्रयत्नांचा निषेध म्हणूनही या राजीनाम्यांकडे पाहिलं जातंय.

ब्राझीलमध्ये आतापर्यंत करोनामुळे जवळपास ३ लाख १४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. काल (30 मार्च) एकाच दिवसात तब्बल ३ हजार ७८० लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला. ब्राझील करोना रुग्णांच्या संख्येत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमधील १ कोटी २६ लाखांहून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. अमेरिका जगात करोना रुग्णांच्या संख्येत पहिल्या स्थानावर आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ब्राझीलमधील आरोग्य व्यवस्था कोलमडली होती. ब्राझीलमधील ८० टक्के इंटेन्सिव्ह केअर बेड्स भरले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या