Wednesday, April 24, 2024
Homeनगरचुलत भावाने घातला व्यापार्‍याला एक कोटींचा गंडा

चुलत भावाने घातला व्यापार्‍याला एक कोटींचा गंडा

कर्जत |वार्ताहर|Karjat

सख्ख्या चुलत भावाने एक कोटी रुपयांना फसवलेे तालुक्यातील प्रतिष्ठित व्यापार्‍यांच्या विरोधात

- Advertisement -

पोलीस कर्जत उपविभागीय पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी सुखेद छोटूलाल दोशी (रा. राशीन) यांच्या फिर्यादीवरून कर्जत येथील उपविभागीय पोलीस स्टेशनमध्ये संस्थेचे चेअरमन अविनाश रमानलाल दोशी आणि सर्व संचालक व प्रवीणकुमार बोधे सचिव (मयत) यांच्या विरोधात फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदार अधिनियम 1999 चे कलम 3 आणि 4 अन्वये एक कोटी 52 लाख 65 हजार रुपयांची संगनमत करून फसवणूक केली असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल फिर्यादीमध्ये सुखेन यांनी म्हटले, त्यांचा सख्खा चुलत भाऊ अविनाश दोशी त्याने 2006 मध्ये राशीन येथे पार्श्वनाथ ग्रामीण बिगर शेती पतसंस्था स्थापन केली होती. अविनाश हा स्वतः संस्थापक चेअरमन आहे. त्याने सुखेद यास पतसंस्थेमध्ये स्वीकृत संचालक करतो, तसेच ठेवीवर चांगले व्याज देतो असे सांगत एक कोटी रुपयांची मुदत ठेव ठेवून घेतल्या. त्याच्या पावत्याही बनवून दिल्या.

मात्र, 2013 साली या संस्थेमध्ये चेअरमन सचिव व संचालक मंडळाने मोठी अफरातफर केली. यावेळी सुखेद दोशी यांनी ठेवी परत मागितल्या असता चेअरमन अविनाश यांनी सांगितले तु घरातील आहे, तूच जर ठेवी काढल्या तर सर्वजण ठेवी काढतील. त्यामुळे तू असे काही करू नको, वेळ आल्यास मी स्वतःची प्रॉपर्टी विकून तुझे पैसे परत करेल. परंतु तू ठेवी काढू नको, असे सांगितले यावर सुखेद यांनी विश्वास ठेवला.

यानंतर चेअरमन दोशी याने सचिव बोधे यांची प्रॉपर्टी ताब्यात घेतली व ती पुतण्या विपुल अजय दोशी याच्या नावावर केली. त्यावेळी ही सर्व प्रॉपर्टी विकून त्यामधून आलेले पैसे संस्थेमध्ये भरू असे सांगितले. परंतु अशी कोणतीही रक्कम संस्थेमध्ये भरले नाही. संस्थेचे दिवंगत सचिव बोधे यांची प्रॉपर्टी लिहून घेण्यात आली. संस्थेमध्ये जमा न करता नातेवाइकांच्या नावावर नोंदवून चेअरमन दोशी यांनी परस्पर विल्हेवाट लावली व बंधू सूखेद यास एक रुपया परत दिला नाही.

उलट पावत्या नूतनीकरण करून देण्याच्या नावाखाली 1 कोटी 70 लाख रुपयांच्या 70 ठेव पावत्या बनावट सह्या करून दिल्या. यानंतर 23 डिसेंबर 2016 रोजी सुखेद दोशी व त्यांचे वडील छोटूलाल हे अविनाश दोशी यांच्या घरी जाऊन आमची पतसंस्थेमधील ठेव आणि व्याजाची अशी मागणी केली असता अविनाश दोशी यांनी छोटूलाल व सूखे द यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव हे तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या