Friday, April 26, 2024
Homeनाशिकलाचखोर धनगर, जोशीची कारागृहात रवानगी

लाचखोर धनगर, जोशीची कारागृहात रवानगी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (Sunita Dhangar) यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी पकडले होते. त्यांच्यासह लिपिक नितीन जोशी (Nitin Joshi) यालाही पाच हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते…

- Advertisement -

दोघांना न्यायालयाने 5 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते, त्याची मुदत संपल्याने दोघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली होती.

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने दोघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोघांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. 

तपासात धनगर यांच्या तीन बँक खात्यांची माहिती मिळाली असून त्याच्यातून तीस लाखापेक्षा जास्त रक्कम मिळून आली होती. शनिवारी एसबीआय बँकेच्या एका खात्यात 12 लाख 71 हजार रुपये जमा असल्याची बाब समोर आली होती. तर पहिल्याच दिवशी धनगर यांच्याघरातून 85 लाख रुपये रोख व 32 तोळे सोने असे कोट्यवधींचे घबाड सापडले होते.

पोलीस अधिक्षक शमिष्ठा वालावलकर नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. संदिप घुगे व पो. नि. गायत्री जाधव यांनी सापळा कारवाई केली होती. धनगर यांना 50 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहे.

पोलीस कोठडी दरम्यान लाचखोर धनगर यांचे बँक खात्याबाबत तपास केले असता स्टेट बँक ऑफ इंडीया, मधील चार वेगवेगळया खात्यात १५,९६,२०१, २,८१,४३५, १२,७१,०२८ व ३६,२२७ रुपये व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नाशिक मधील खात्यावर ३१७२९ रुपये असे एकूण ३०,१६,६२० रूपये ऐवढी रक्कम मिळून आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या