Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रकही खुशी, कही गम! जयश्री पाटील यांना दिलासा तर, अ‍ॅड. सदावर्तेंना १४...

कही खुशी, कही गम! जयश्री पाटील यांना दिलासा तर, अ‍ॅड. सदावर्तेंना १४ दिवसांची कोठडी

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) वारसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा पोलिसांच्या अटकेत….

- Advertisement -

असलेले वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांची आज चार दिवसांची पोलीस कोठडी संपली. त्यामुळे त्यांना आज पुन्हा सातारा कोर्टात हजर करण्यात आलं. गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सातारा कोर्टाने दिली आहे.

तर अ‍ॅड. जयश्री पाटील यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना २९ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल असून त्या अद्याप न्यायालयासमोर आल्या नाहीत.

- Advertisment -

ताज्या बातम्या