Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकस्थलांतरीत कामगारांसाठी समुपदेशन, सुविधा केंद्र

स्थलांतरीत कामगारांसाठी समुपदेशन, सुविधा केंद्र

सातपूर । प्रतिनिधी

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी कामगार विभागाच्या कार्यालयामध्ये स्थलांतरीत कामगारांकरीता समुपदेशन व सुविधा केंद्र स्थापन करण्याचे आदेशानुसार जिल्ह्यातील उद्योग भवन येथील कामगार उपायुक्त कार्यालयात सदर केंद्र स्थापन करण्यात आले.

- Advertisement -

नाशिक विभागाचे कामगार उपायुक्त गुलाबराव उप आयुक्त गुलाबराव दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समितीची निवड करण्यात आली. यात केंद्रप्रमुख म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त सु.तु. शिर्के तसेच मालेगाव कार्यालयासाठी सरकारी कामगार अधिकारी वि.प. पाटील यांची केंद्र प्रमुख म्हणुन नियुक्ती करण्यात आली..

नाशिक शहरातून आतापर्यंत सुमारे दहा ते पंधरा हजार परप्रांतीय आपल्या गावाकडे पोहोचले आहेत. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार आणखी काही लोक अडकले आहेत अथवा आपल्या गावाकडे जाऊ इच्छितात मात्र शासनाकडे त्याची माहिती नसल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार सुप्रीम कोर्टाने शासनाला वेबसाईटच्या माध्यमातून गावाकडे जाऊ इच्छिणार्‍यांना सविस्तर माहिती संकलित करण्याचे आवाहन करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कामगार मंत्रालयाने विभागीय निहाय काम सुरु केले आहे.

यात शहर व राज्यात कायम नोकरीला असलेल्या नागरिकांना या सेवेचा लाभ मिळणार नाही. राज्यात स्वतःचे घर असणार्‍यांना या सुविधेतून वगळण्यात येणार आहे. केवळ भाडोत्री घरात राहणारे व हंगामी कामगारांना त्यांच्या गावी जायचे असल्यास त्यांनी वेबसाईटवर अर्ज दाखल करावे. कामगार उपायुक्तांनी नेमलेल्या समितीद्वारे या अर्जांची छाननी केली जाईल. त्यांची सत्यता तपासल्यानंतर अर्ज मंजूर करण्यात येतील. त्यानंतर ते जिल्हाधिकार्‍यांनी नेमलेल्या नोडल अधिकार्‍याकडे पाठवले जातील. शासनस्तरावरुन त्यां नागरीकांची जाण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या