हेल्मेट न वापरणार्‍यांसाठी आता समुपदेशन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात दुचाकीवर हेल्मेट वापरण्यासाठी ( To use a helmet on a bike ) ठिकठिकाणी भरारी पथके (squads )नेमण्यात येणार असून त्याद्वारे हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणाऱ्या नागरिकांचे दोन तासांचे समुपदेशन ( Counseling )करण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक पोलीस सहआयुक्त सीताराम गायकवाड (City Traffic Police Joint Commissioner Sitaram Gaikwad ) यांनी दिली आहे.

नो हेल्मेट नो पेट्रोल ही मोहीम राबवली (No Helmet No Patrol campaign )असली तरी ऑगस्ट महिन्यामध्ये ९ नागरिकांचे अपघात होऊन त्यांनी जीव गमावला आहे. नागरिक फक्त पेट्रोल भरण्या पुरतेच हेल्मेट वापरत असल्याचे लक्षात आल्याने पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नागरिकांनी हेल्मेट वापरावे यासाठी नवी युक्ती अवलंबली आहे.

दरम्यान, शहरात ठिकाणी फ्लाईंग स्कॉड नेमण्यात येणार असून त्यांच्याद्वारे हेल्मेट परिधान न केलेल्या नागरिकांना पकडण्यात येणार आहे. त्यांची दुचाकी ताब्यात घेतली जाणार आहे तसेच त्यांना पोलीस वाहनातून नाशिक फर्स्ट या मुंबई नाक्यावरील पोलीस समुपदेशन केंद्रांमध्ये दोन तासाचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

समुपदेशन पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्यांची सुटका करण्यात येणार आहे. तरीदेखील हेल्मेट विना ती व्यक्ती दुचाकीवर आढळल्यास त्या व्यक्तीकडून दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सह आयुक्त सिताराम गायकवाड यांनी दिली आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *