Wednesday, April 24, 2024
Homeजळगावकापूस खरेदी सुरळीत; शेतकर्‍यांना जागेवरच टोकन

कापूस खरेदी सुरळीत; शेतकर्‍यांना जागेवरच टोकन

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हयात कापूस खरेदी केंन्द्रांवर मोठया प्रमाणावर शेतकर्‍यांनी आणलेल्या मिनी डोअर, टॅ्रक्टर वा अन्य वाहनांची गर्दी झाली आहे.

- Advertisement -

रस्त्याच्या दुतर्फा या वाहनांच्या लांबच लांब रांगा मंगळवार सायंकाळनंतर लागलेल्या दिसून येत आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मंगळवार दि. 8 रोजी कापूस खरेदी केंद्रांबाबत संबंधीत अधिकार्‍यांची बैठक बोलावून संबंधीतांना दिलेल्या आदेशानंतर कापूस खरेदी सुरळीत झालेली दिसून येत आहे.

जिल्हयात कापूस विक्रीसाठी शेतकर्‍यांकडून ऑनलाईन नोंदणी केवळ धरणगांव पारोळा व पाचोरा या केन्द्रावरच सुरू असून अन्य ठिकाणी कापूस खरेदी केन्द्रांवरच शेतकर्‍यांना टोकन दिले जाउन कापसाची मोजणी केली जात असल्याचे सुत्रांनी सांगीतले.

जिल्हयात कापूस हंगाम 2020-21 अंतर्गत यावर्षी तब्बल 15 ते 20 दिवस उशीराने कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे.

बहुतांश ठिकाणी गत वषीर्र्चा अनुभव पहाता कापूस विक्रीसाठी शेतकर्‍यांकडून मोठया प्रमाणावर नोंदणी करून केन्द्रांवर वाहनांच्या रांगा लावल जात आहेत. मंगळवार दि.8 डिसेंंबर रोजी शेतकरी हित विरोधी काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी ‘भारत बंद’चा परीणाम देखिल कापूस खरेदी केंन्द्रांवर झाला होता.

जिल्हयातील बहुतांश ठिकाणी असलेल्या सीसीआयसह पणन कापूस खरेदी केंद्रांवर मोठया प्रमाणावर गर्दी वाढली असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या