Monday, April 29, 2024
Homeनगरनगरसेवकास जीवे मारण्याची धमकी

नगरसेवकास जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

महापालिकेचे नगरसेवक अमोल येवले (Municipal Corporation corporator Amol Yeole) यांना दुचाकीवरून आलेल्या तिघा अनोळखी व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिल्याची घटना घडली आहे. तसेच आरोपींनी दगडफेक (Stone Throwing) करत दोन चारचाकी वाहनांचे नुकसान (Damage to Vehicles) केले आहे. या संदर्भात अभिजीत अर्जुन कोतकर (वय 32, रा. कोतकर मळा, केडगाव, अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिल्मसिटीचे हसीन सपने कोविडमुळे मंदावले

रविवार 10 एप्रिल, 2022 रोजी रात्री एकच्या दरम्यान दुचाकीवरून तिघे कोतकर यांच्या हॉटेल सागर या ठिकाणी आले. आरोपींनी चेहरे पुर्णपणे झाकलेले होते. त्यातील एका आरोपीने हॉटेलवरील कामगाराला, ‘कुठे आहे तो अमोल येवले’, असे विचारले. तसेच त्यानंतर ‘तुम्ही इथून निघून जा, येथे अमोल येवलेचा मर्डर होणार आहे’, असे आरोपी म्हणाले. काही काळ आरोपींनी तेथे धिंगाणा घातला आणि नंतर हॉटेलसमोर असणार्‍या चारचाकी वाहनांवर दगडफेक सुरू केली. यामध्ये ह्युंडाई क्रेटा (एमएच 16 बीएच 3903) आणि टाटा अल्ट्रोज (एमएच 16 सीव्ही 6333) यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोतवाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

एलसीबीच्या खुर्चीकडे कोणाची नजर?महापालिकेच्या सहकार्याने नगरमध्ये उभारणार ईव्ही चार्जिंग स्टेशन

- Advertisment -

ताज्या बातम्या