वॉटरग्रेसचा ठेका रद्द करण्यासाठी नगरसेवक आक्रमक

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

वॉटरग्रेस सफाई कामगार ठेका Watergrass sweepers Contract रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक महासभेत आक्रमक झाले होते. तर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील Coporator Dinkar Patil यांनी नोकरीभरती प्रस्तावाचे समर्थन करीत मागील अनेक वर्षापासून महापालिकेत NMC भरती झाली नाही. यामुळे कामावर परिणाम होत आहे, असे सांगितले.

दरम्यान त्यांनी सफाई कर्मचारी ठेकेदार व महापालिका अधिकार्‍यांमध्ये संगनमत असल्याचा आरोप केला. ठेकेदारावर कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्न उपस्थित करून तात्काळ त्याचा ठेका रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली. त्याचे सर्व विरोधी पक्षांनी समर्थन करीत जोरदार घोषणाबाजी केली.

ठेकेदाराने सेवकांकडून पंधरा हजार रुपये घेतले व त्याची माहिती प्रशासनाला देखील आहे. तरीही त्याच्यावर कारवाई का होत नाही? घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड यांना या ठिकाणी येऊन चार महिने उलटले तरी त्यांनी अद्याप काहीच कारवाई केली नाही, असा आरोप करीत ठेकेदार मोठा माणूस आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वॉटर ग्रेस कंपनीच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याचा ठेका रद्द करण्यात यावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली,.

महापालिकेकडून 22 हजार रुपये सेवकासाठी निघतात. मात्र सेवकांच्या हातात फक्त दहा हजार रुपये येतात, असे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी देखील पारदर्शक कारभार करण्याचे सांगत ऐन निवडणुकीच्या तोंडावर नोकरभरतीचा विषय का, याबद्दल संभ्रम निर्माण झाल्याचे सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार नाशिक साठी पॉझिटिव आहे, मागील अनेक वर्षापासूनचा अनुकंपाचा विषदेखील महाविकास आघाडी सरकारने मार्गी लावला. असे त्यांनी सांगितले. भाजपची सत्ता असताना 2017 मध्ये आकृतिबंधाच्या प्रस्ताव राज्य शासनाकडे गेला होता त्या वेळेत तो मंजूर का करण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्यासह चार सदस्यांनी पत्र देऊन आजची विशेष महासभा घेण्याचे सांगितले होते, मात्र गीते यांनी चर्चेत विशेष असा भाग घेतला नाही. दरम्यान सभापती गणेश गीते हे अधून मधून विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे यांच्याशी चर्चा करीत होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *