Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशकरोनाचे थैमान! भारतात गेल्या २४ तासांत सर्वाधिक मृतांची नोंद

करोनाचे थैमान! भारतात गेल्या २४ तासांत सर्वाधिक मृतांची नोंद

दिल्ली l Delhi

भारतामध्ये करोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर अजूनही सुरू आहेच. देशात मागील २४ तासांमध्ये करोना रूग्ण वाढीमध्ये नवा उच्चांक समोर आला आहे.

- Advertisement -

आजही चार लाखांहून अधिक करोनाचे रुग्णांनी भर पडली आहे. तर चार हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व्यवस्थेंचा उडालेल्या बोजवाऱ्यामुळे देशात मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजवला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात ४ लाख ०१ हजार ०७८ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर एका दिवसात ४ हजार १८७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३ लाख १८ हजार ६०९ जणांनी करोनावर मात केली आहे.

महत्वाची बातमी : मुलांसाठी या लसीला मिळाली मंजुरी

आतापर्यंत देशात २ कोटी १८ लाख ९२ हजार ६७६ जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १ कोटी ७९ लाख ३० हजार ९६० जणांनी करोनावर मात केली आहे. तर २ लाख ३८ हजार २७० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात सध्या ३७ लाख २३ हजार ४४६ करोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, आतापर्यंत १६ कोटी ७३ लाख ४६ हजार ५४४ जणांचं लसीकरण केलं असल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य खात्यानं दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या