Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशCOVID19 : थोडासा दिलासा! भारतात आज २.७६ लाख नवे रुग्ण, मृतांचा आकडा...

COVID19 : थोडासा दिलासा! भारतात आज २.७६ लाख नवे रुग्ण, मृतांचा आकडा घटला

दिल्ली | Delhi

करोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनने भारतात चांगलाच कहर केला आहे. एकीकडे केंद्र-राज्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, करोनाच्या संसर्गाच्या प्रसाराला अद्यापही ब्रेक लागलेला नाही.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या २४ तासात दैनंदिन रुग्ण संख्येत थोडीशी घट नोंदविली गेली आहे. मात्र देशात रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली, तरी मृत्यूचं प्रमाण वाढलं असून, ते कायम आहे. गेल्या आठवड्यात सलग चार ते पाच दिवस देशात दिवसाला चार हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली होती. हा आकडा काही प्रमाणात कमी झाला असला, तरी सरासरी कायम आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २ लाख ७६ हजार ०७० नवे करोना रुग्ण आढळले असून ३ हजार ८७४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ५७ लाख ७२ हजार ४०० इतकी झाली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ८७ हजार १२२ वर पोहोचली आहे.

ICMR कडून होम बेस्ड टेस्ट किटला मंजुरी, आता घरीच करता येणार करोना चाचणी

तसेच देशात गेल्या २४ तासात ३ लाख ६९ हजार ०७७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी २३ लाख ५५ हजार ४४० वर पोहचली आहे.

देशातील करोना मृत्यूदर १.११ टक्के आहे. तर रिकव्हरी रेट टक्केंपेक्षा जास्त आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत दररोज घट होत असून याची टक्केवारी १३ इतकी आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण १८ कोटी ७० लाख ०९ हजार ७९२ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील ११ लाख ६६ हजार ०९० लसीचे डोस बुधवारी देण्यात आले.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांत काहीसा कमी होताना दिसत आहे. राज्यात काल ३४ हजार ०३१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ५१ हजार ४५७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. राज्यात एकूण ४ लाख १ हजार ६९५ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९१.०६% झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या