Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशCorona Update : भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत चढउतार सुरुच, केरळमध्ये सर्वाधिक

Corona Update : भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत चढउतार सुरुच, केरळमध्ये सर्वाधिक

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा कहर पाहायला मिळत असून दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. सलग ५ दिवस ४० हजारांहून जास्त रुग्ण सापडल्यानंतर मंगळवारी देशात ३१ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली होती. मात्र पुन्हा एकदा देशात रुग्णसंख्या ४० हजारांच्या वर गेली आहे. काही तज्ज्ञांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेची (Corona third wave) सुरुवात म्हणून या संक्रमणाच्या वाढलेल्या आकड्याकडे पाहिलं जात असल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार ९६५ जणांना करोनाचा (COVID new patient today) संसर्ग झाला आहे. त्यामुळे, देशात सद्यस्थितीत करोनावर उपचार घेणाऱ्यांचा (Corona active patient) एकूण आकडा ३ लाख ७८ हजार १८१ वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे याच २४ तासांत देशात ३३ हजार ९६४ जण करोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता ३ कोटी १९ लाख ९३ हजार ६४४ वर पोहोचली आहे.

देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी २८ लाख १० हजार ८४५ करोना रुग्णांची नोंद (Corona cases in india) झाली आहे. त्यापैकी, ३ कोटी १९ लाख ९३ हजार ६४४ इतके रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांत देशात ४६० इतक्या लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे, देशातील करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा आता ४ लाख ३९ हजार २० वर (Corona death in india) पोहोचला आहे.

केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण (Keral corona update)

दरम्यान केरळमध्ये अद्याप करोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. देशातील एकूण रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक रुग्ण हे केरळमधील आहेत. काल दिवसभरात केरळमध्ये ३० हजार २०३ नवे रुग्ण सापडले. तर ११५ जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये गेल्या आठवड्याभरात दर दिवशी २० ते ३० हजार रुग्ण सापडत आहेत.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Coronavirus Maharashtra Highlights)

राज्यात काल ४ हजार १९६ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ६८८ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ७२ हजार ८०० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के आहे. राज्यात काल १०४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे.

दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनीही या करोना परिस्थितीवर भाष्य केलं आहे. तसेच करोना संक्रमणाची तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा त्याचा परिणाम कमीत कमी व्हावा यासाठी संभाव्य प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याची आवश्यकता आहे. याचाच एक भाग म्हणून देशात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला जात आहे. देशाला प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सेस सोबतच चाचणी सुविधांची आणखी गरज भासू शकते, असं सांगतानाच लहान आणि मध्यम दर्जाच्या शहरांत रुग्णालयांची क्षमता वाढवण्याची गरजही अर्थमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी आरोग्य सुविधा मजबूत करण्याच्या संदर्भात एका वेबिनारला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या