Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणार्‍यांची संख्या जास्त

राज्यात आज करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणार्‍यांची संख्या जास्त

मुंबई |Mumbai –

करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात अद्यापही वाढत असला तरी, नवे करोनाबाधित आढळण्याबरोबरच आता करोनामुक्त होणार्‍यांची संख्याही वाढत आहे. सर्वात जास्त करोनाचा प्रादुर्भाव असलेल्या राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र राज्यासाठी ही निश्चितच दिलासादायक बाब म्हणावी लागेल. आज राज्यात 13 हजार 348 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. coronavirus in maharashtra

- Advertisement -

राज्यात आज दिवसभरात 12 हजार 248 नवे करोनाबाधित आढळले, तर 390 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. याचबरोबर आज दिवसभरात 13 हजार 348 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता 5 लाख 15 हजार 332 वर पोहचली आहे. यामध्ये करोनामुक्त झालेले 3 लाख 51 हजार 710 जण, सध्या उपचार सुरू असलेले 1 लाख 45 हजार 558 रुग्ण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 17 हजार 757 जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 66 नवे करोनाबाधित आढळले, तर 48 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. याचबरोबर मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 23 हजार 397 वर पोहचल आहे. यामध्ये आतापर्यंत रुग्णालयातून सुट्टी मिळालेले 96 हजार 586 जण, सध्या उपचार घेत असलेले 19 हजार 718 रुग्ण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 6 हजार 796 जणांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या