Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशकाळजी घ्या! देशात करोना बाधितांच्या संख्येचा आलेख चढता

काळजी घ्या! देशात करोना बाधितांच्या संख्येचा आलेख चढता

दिल्ली | Delhi

देशात पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. देशात गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.

- Advertisement -

देशात गेल्या २४ तासात देशात तब्बल ३५ हजार ८७१ नवे करोनाबाधित सापडले आहेत. या वर्षभरातली ही एका दिवसातली सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. त्यामुळे देशभरातील एकूण करोनाबाधितांचा आकडा आता १ कोटी १४ लाख ७४ हजार ६०५ इतका झाला आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये १७२ रुग्णांचा मृत्यू झाला असून १७ हजार ७४१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशभरात २ लाख ५२ हजार ३६४ सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत १ लाख ५९ हजार २१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात बुधवारी १० लाख ६३ हजार ३७९ करोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण २३ कोटी ०३ लाख १३ हजार १६३ करोना चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती ICMR ने दिली आहे.

देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आढळून येत आहे. महाराष्ट्रात बुधवारी करोना संक्रमित २३ हजार १७९ रुग्णांची भर पडली. २०२१ सालातील ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. राज्यात आतापर्यंत एकूण २३ लाख ७० हजार ५०७ करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. यातील ५३ हजार ०८० रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान महाराष्ट्रात बुधवारपर्यंत ३६ लाख ३९ हजार ९८९ रुग्णांचं लसीकरण करण्यात आलंय. यातील २ लाख ७४ हजार ०३७ रुग्णांना बुधवारी एकाच दिवशी लस देण्यात आलीय.

- Advertisment -

ताज्या बातम्या