Monday, April 29, 2024
Homeनाशिकदुग्धाभिषेक, महाआरतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

दुग्धाभिषेक, महाआरतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

पंचवटी । प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त पंचवटी परिसरातील मालेगाव स्टॅण्ड मित्र मंडळाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ५१ लिटर दुधाने दुग्धाभिषेक आणि महाआरती करून राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

- Advertisement -

मालेगाव स्टॅन्ड मित्र मंडळाच्या वतीने रविवार दि ६ जून रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून महाराजांच्या पुतळ्याला ५१ लिटर दुधाने मंत्रोचार करीत अभिषेक करण्यात आला . त्यानंतर पाण्याने अभिषेक करून महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराजांची महाआरती करण्यात आली .यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

या शिवराज्याभिषेक दिनासाठी पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मामा राजवाडे,उल्हास धनवटे,नरेश पाटील,सागर बैरागी,विशाल देशमुख,किरण पानकर,शाहू पवार, मनोज जाधव, विलास जाधव, साहिल बैरागी, राम तांबे,अनिल अलई,सतीश काळे, गुरजितसिंग रंधवा, मयूर नाटकर,योगेश पवार,प्रकाश गवळी,प्रशांत सोनवणे,गंगाराम बोधले,प्रथमेश येवले,केशव देशमुख,योगेश परदेशी आदींसह मंडळाचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते .

- Advertisment -

ताज्या बातम्या