Friday, April 26, 2024
Homeजळगावकोरोनाच्या रुग्णवाढीने जिल्हा पुन्हा हादरला

कोरोनाच्या रुग्णवाढीने जिल्हा पुन्हा हादरला

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात आज 15 फेब्रुवारी रोजी 124 नवे केरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 57 हजार 751 एवढी झाली आहे. तसेच आज एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नसून 32 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य यंत्रणेकडून कोरोनाच्या चाचण्या वाढविल्यानंतर रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने जिल्हा पुन्हा हादरला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात जळगाव ग्रामीण, भडगाव, यावल, एरंडोल या चार तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 55 हजार 885 जणांनी कोरोनावर मात केली आहे . तर दुसरीकडे आतापर्यंत 1 हजार 367 बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 45, भुसाळव 1, अमळनेर 12, चोपडा 12, पाचोरा 4, धरणगाव 10, जामनेर 3, रावेर 2, पारोळा 5, चाळीसगाव 28, बोदवड 2 असे एकूण 124 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सोमवारी दिवसभरात शहरातील एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात 614 जणांनी घेतली लस

जिल्ह्यातील वीस केंद्रावर आज लसीकरणाची मोहिम पार पडली. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 44, जामनेर 24, चोपडा 29, मुक्ताईनगर 27, चाळीसगाव 19, पारोळा 24, भुसावळ 34, अमळनेर 46, पाचोरा 49, रावेर 44, यावल 7, गाजरे हॉस्पिटल 42, गोल्डसिटी जळगाव 59, भडगाव 59, बोदवड 5, एरंडोल 20, भुसावळ रेल्वे हॉस्पीटल 12, ऑर्कीड हॉस्पीटल 33, धरणगाव 37, डी. बी. जैन रुग्णालय जळगाव 0 असे एकूण 614 जणांनी लस टोचून घेतली. आतापर्यंत 14 हजार 716 जणांनी लस घेतली. तसेच लसीकरणाचा दुसरा डोसला आज पासून सुरुवात झाली. आज दिवसभरात जिल्ह्यातील 165 जणांनी दुसरा लसीचा दुसरा डोस घेतला.

एरंडोल येथील नायब तहसीलदारांसह दोन लिपीक पॉझिटिव्ह

एरंडोल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील एक नायब तहसीलदारासह दोन लिपीक पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसात या कार्यालयास भेट दिलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या