Thursday, April 25, 2024
Homeधुळेकरोना योद्ध्यांनी संकट काळात जनतेचे मनोधैर्य वाढविले

करोना योद्ध्यांनी संकट काळात जनतेचे मनोधैर्य वाढविले

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

करोनासारख्या महाभयानक रोगाबरोबर लढण्याची हिंमत देणार्‍या कोरोना योध्दांचा देशाला अभिमान आहे.

- Advertisement -

करोना योध्दांनी संकटाकाळात जनतेचे मनोधैर्य वाढविले आहे म्हणून त्यांच्या लढ्यात प्रत्येकाने साथ दिली पाहिजे असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी केले.

बोरीस, बुरझड, निकुंभे, नंदाणे येथील वैद्यकिय सेवा देणार्‍या डॉक्टरांचा आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला.

डॉ.अनिल जैन, बोरीस, डॉ.नितीन पाटील, बुरझड, डॉ.रवि पाठक, नंदाणे यांनी आरोग्यदूताची भूमिका बजावत बोरीस परिसरात कोरोना काळात जीवाची पर्वा न करता वैद्यकीय सेवा दिली. ग्रामीण भागात रात्री रुग्णाची प्रकृती बिघडल्यावर तत्काळ उपचार करुन त्यांना मानसिक व आरोग्यदृष्ट्या सुदृढ करण्याचे काम या डॉक्टरांनी केले आहे.

पुढे बोलतांना आ.कुणाल पाटील म्हणाले की, कोरोनामुळे माणसामाणसात अंतर निर्माण झाले.कोरोना योध्दयांनी जनतेचे आणि रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम केले आहे. आजही प्रत्येक जण भितीच्या छायेत वावरत आहे.

डॉक्टर, परिचारीका, वैद्यकीय कर्मचारी, पोलिस, स्वच्छता कर्मचारी त्याबरोबर स्वयंसेवी संस्था यांच्यासह कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी ज्यांनी काम केले. त्या सर्वच कोरोना योध्दांचा देशाला अभिमान आहे. असे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले.

कोरोना योध्दा डॉक्टरांचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र,शाल श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे, माजी पं.स.सदस्य परशराम देवरे, कृषीभूषण भिका पाटील, बुरझड, उपसरपंच एन.डी.पाटील, माधवराव पाटील, चिंचवार सरपंच सोमनाथ पाटील,बेहेड माजी सरपंच अर्जुन पाटील, ज्येष्ठ नेते जगन जाधव, माजी पं.स.सदस्य योगेश पाटील, रामकृष्ण पाटील वडणे, मका पाटील, देवचंद पाटील, चेअरमन सुनिल गिरासे, हिंमत पाटील, शांतीलाल पाटील, हिरामण पाटील, जगन पाटील, युवराज वाघ, पन्नालाल पाटील, नाना गोरख पाटील, अशोक पाटील यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवराज वाघ यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या