Saturday, April 27, 2024
Homeजळगावकरोना योध्दे देवदूतच !

करोना योध्दे देवदूतच !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या सात आठ महिन्यांपासून करोना प्रादुर्भावामुळे इतर सर्वसामान्यांना दूर ठेवले. यासोबतच दुर्देवाने कोरोना बाधित रुग्णांची अहोरात्र सेवा केली.

- Advertisement -

या रूग्णसेवेव्दारे कोरोना योध्दांनी सामाजिक दातृत्वाचे दर्शनच घडविले आहेत. करोना साथरोग प्रादुर्भाव सर्वत्र नव्यानेच असल्याने प्रारंभी ठोस उपाययोजना नव्हती.

अनुभवातून नवनवीन औषधोपचारांव्दारे इलाज करून कोरोनावर डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी व आरोग्य विभागाने हार न मानता रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे राहून रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना धीर देऊन सामाजिक जाणीवेतून केलेले कार्य हे देवदुतापेक्षा नक्कीच कमी नाही, असे गौरवोद्गार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

आरोग्य सेवा यंत्रणेतील डॉक्टर, आरोग्यसेविका, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी कोरोना योध्दयांचा सत्कार आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे आयोजीत लघु चित्रफितीचे प्रसारण पालकमंत्री ना.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात परराज्यातील मजुरांचे मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यातून विविध मार्गांनी स्थलांतरामुळे देखिल कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली.

यावेळी अनेक सामाजिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत मजुरांना अन्नपाण्याची सोय करीत राज्यासह देशात जिल्ह्याची प्रतिमा उंचावली. कोरोना योद्ध्यांचा आजचा सन्मान हा एक प्रातिनिधीक स्वरुपातील असल्याचे त्यांनी सांगीतले.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जि.प.सीईओ डॉ. बी. एन. पाटील, सिव्हील सर्जन डॉ. एन. एस. चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, डॉ. समाधान वाघ, माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोडे, जिल्ह्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद, महानगर पालिकेतील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच कोरोना काळात उत्कृष्ट काम करणार्‍या संस्थांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या