Monday, April 29, 2024
Homeनगररुग्णांच्या मदतीसाठी युवकांनी साकारली करोना वॉर रुम

रुग्णांच्या मदतीसाठी युवकांनी साकारली करोना वॉर रुम

कोपरगाव (प्रतिनिधी)-

एमबीए झालेले तुषार संजय पोटे यांनी गावातील युवकांना एकत्र आणून तालुक्याच्या सेवेसाठी, रुग्णांची मदत म्हणून वैद्यकीय सुविधा देण्यासाठी एक #हेल्पलाईन आणि #वॉर_रुम सुरू केली आहे. एक पाऊल मातृभूमीसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या गावच्या लोकांसाठी काम करायला अनेक युवकांनी सहभाग घेतला आहे.

- Advertisement -

राज्यासह देशभरात करोनाचा हाहाकार सुरू आहे. देशभरात चार लाख रुग्ण आढळून आलेत. ही महामारी रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात असतांनाच रुग्णांना कुठे बेड तर कुठे #व्हेंटिलेटर्स मिळत नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये लूट सुरू असून वेळेत रुग्णवाहिका देखील मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करत तरूणांनी एकत्र येत रूग्णांच्या मदतीसाठी वॉर रुम सुरू केली आहे. रूग्णांच्या नातेवाईकांना येणार्‍या अडचणी या वॉर रुम मार्फत सोडविल्या जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या