Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशनव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व राज्यांत करोना लसीची 'ड्राय रन'

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व राज्यांत करोना लसीची ‘ड्राय रन’

दिल्ली । Delhi

करोना लसीच्या (Corona Vaccine) पुरवठ्यासाठी चार राज्यांमध्ये ड्राय रनचे (Dry Run) यशस्वी आयोजन केल्यानंतर केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. भारतातील अवाढव्य लोकसंख्येला टप्प्याटप्प्यानं लस उपलब्ध

- Advertisement -

करून देण्यासाठी करोना लशीची रंगीत तालीम सुरू करण्यात आलीय. २ जानेवारी अर्थात येत्या शनिवारपासून देशातील प्रत्येक राज्यात लसीकरणाचं ‘ड्राय रन’ अर्थात करोना लशीची रंगीत तालीम सुरू होणार आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ही माहिती दिली आहे. डॉ. व्ही. जी. सोमानी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने आत्तापर्यंत ८३ कोटी सीरिंज खरेदी केल्या आहेत. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लसीकरणाचा ड्राय रन पार पडणार आहे.

२०२० या वर्षाच्या सुरुवातीला करोनाचा शिरकाव भारतात झाला. मार्च महिन्यापासून महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाउन करण्यात आला. करोना सारख्या संसर्गजन्य आजारावर लस शोधण्याचं कामही सुरु झालं. आता २०२१ च्या स्वागताची तयारी अवघा देश करत असताना मोदी सरकारने नव्या वर्षात लसीकरणाचा ड्राय रन राबवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातल्या सर्व राज्यांमध्ये २ जानेवारीला हा ड्राय रन पार पडणार आहे.

पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये आत्तापर्यंत ड्राय रन पार पडला आहे. त्याचे चांगले परिणामही समोर आले आहेत. ज्यानंतर आता केंद्र सरकारने २ जानेवारी रोजी सर्व राज्यांमध्ये करोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीचा ड्राय रन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या