Video : करोना लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम संपन्न

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे बहुप्रतीक्षित कोविड १९ प्रतिबंधक लस ही नेमकी कधी दिली जाणार याबद्दल उत्सुकता असतांना जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारी (दि.८) करोना लसीकरण मोहिमेचा ड्राय रन घेण्यात आला . यामध्ये हे लसीकरण कशाप्रकारे पार पाडले जाणार याची रंगीत तालीम करण्यात आली.

या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सय्यद पिंपरी येथे उपस्थित राहून घेतला.कोविड १९ प्रतिबंधक लस देण्यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये तीन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. पहिल्या कक्षात आलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या कक्षात लसीकरण करण्यात येईल.

लसीकरण झाल्यानंतर तिसऱ्या कक्षात लसीकरण झालेल्या व्यक्तीला ३० मिनिटे निरीक्षणाखाली ठेऊन त्यानंतरच सोडण्यात येईल. यावेळी एखाद्या व्यक्तीस प्राथमिक उपकेंद्रातून जिल्हा रुग्णालयात हलवण्याची वेळ आल्यास १०८ रुग्णवाहिकेची रंगीत तालीम सुद्धा घेण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, अतिरिक्त गट विकास अधिकारी विनोद मेढे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कैलास भोये, डॉ. माधव अहिरे आरोग्य अधिकारी, डॉ परशुराम किरवले आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. जयश्री नटेश, आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री पाटील यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *