Thursday, April 25, 2024
Homeजळगावजिल्ह्यात 9 केंद्रावर होणार लसीकरण

जिल्ह्यात 9 केंद्रावर होणार लसीकरण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या कोरोनाच्या लसीकरणाला शुक्रवार 16 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांना लस टोचली जाणार आहे. यामध्ये आज सात केंद्रावर 3 हजार 400 लसीचे टोस रवाना करण्यात आले आहे.

देशभरात 16 जानेवारी पासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यानुसार पुणे येथील सिरम इन्सिटट्युटची कोविशील्ड लसीचे 23 हजार 320 डोस जिल्हा वैद्यकीय रुग्णालयाकडे गुरुवारी सायंकाळी उपलब्ध झाली.

आज दुपारी 2 वाजेपासून जिल्हाभरात या लसींचे टोस पोहचविण्याचे काम सुरु होते. शेवटचा फेरी ही चाळीसगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पोहचविण्यात आले आहे.

यासाठी प्रत्येक रुग्णावाहिकेवर कोल्ड स्टोअरेजची सुविधा असलेला बॉक्स ठेवण्यात आला होता. यावेळी त्यांच्यासोबत 2 परिचारीका एक चालक व 2 सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली होती.

दरदिवशी 100 जणांना टोचणार लस

जिल्ह्यात 9 ठिकाणी लसीकरण होणार असून प्रत्येक केंद्रावर 100 याप्रमाणे दिवसभरात 900 जणांना ही लस टोचली जाणार आहे.

केंद्रचालकांकडून मागणी केलेल्या पुरवठ्यानुसार त्यांना लसीचा पुरवठा करण्यात आला असून उर्वरीत पुरवठा दुसर्‍या टप्प्यात केला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली.

सात ठिकाणी रवाना झाली लस

जिल्ह्यातील जामनेर, चोपडा हे दोन उपजिल्हा रुग्णालय, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा या तीन ग्रामीण रुग्णालयात तर जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डी. बी. जैन रुग्णालय या सात ठिकाणी त्याठिकाणावरील मागणीनुसार लसीचे डोस रवाना झाले आहे.

असे झाले लसीचे वाटप

जामनेर- 450

चोपडा- 550

भुसावळ- 550

चाळीसगाव- 450

पारोळा- 400

महापालिका रुग्णालय- 1000

असे एकूण- 3 हजार 400

महापालिकेला दिले 1 हजार डोस

महापालिकेने शासकीय जिल्हा रुग्णालयाकडे मागणी केल्यानुसार त्यांच्याकडे लसीचे 1 हजार डोस पोहचविण्यात आले आहे. शुक्रवारी मनपाच्या आरोग्य कर्मचार्‍यांना ही लस टोचली जाणार असल्याने त्या दृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या