Saturday, April 27, 2024
Homeजळगावजिल्ह्यात 42 पैकी केवळ 7 केंद्रांवर लसीकरण

जिल्ह्यात 42 पैकी केवळ 7 केंद्रांवर लसीकरण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

लसीचा तुटवड्यानंतर गेल्या आठवड्यात जिल्ह्याला 40 हजार लसीचे डोस प्राप्त झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर लसीकरणाला पुन्हा सुरुवात झाली होती.

- Advertisement -

परंतु गेल्या दोन दिवसांपासून लसीचा पुन्हा तुटवडा निर्माण झाल्याने जिल्ह्यातील 42 लसीकरण केंद्रांपैकी केवळ 7 केंद्रावर आज लसीकरण झाले.

तसेच आज रात्रीपर्यंत लसीचे 9 हजार डोस प्राप्त झाल्यानंतर पुन्हा लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

एकीकडे करोनाबाधितांच्या वाढती संख्या तर दुसरीकडे देशभरात लसीकरणाचे वेग पकडला आहे. केंद्र शासनाने 45 वर्षावरील सर्वच व्यक्तींना लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषण केलयानंतर देशभरात लसीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.

गेल्या आठवड्यात जिल्ह्याला लसीचे 40 हजार डोस प्राप्त झाले होते. त्यामुळे जिल्हाभरात सर्वच ठिकाणी लसीकरणाचे वेग पकडला होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून लसीचे डोस संपल्यानंतर जिल्ह्यातील काही केंद्रावरील लसीकरण बंद पडले आहेत.

जिल्ह्यात सोमवारी रात्रीपर्यंत 9 हजार डोस प्राप्त होणार आहे. यामध्ये 5 हजार कोविशिल्डचे तर 4 हजार 420 को-व्हॅक्सिनचे डोस प्राप्त होणार आहे. लसीचे डोस प्राप्त झाल्यानंतर केंद्रांच्या मागणीनुसार त्या केंद्रांना लसीचे डोस पुरविले जाणार असून लवकरच लसीकराला पुन्हा सुरुवात होणार आहे.

42 पैकी 7 केंद्रावर लसीकरण

जिल्ह्यात लसीकरणासाठी 42 केंद्र तयार करण्यात आली आहे. यात शासकीय ग्रामीण रुग्णालयांसह खासगी रुग्णांलयाचा देखील सहभाग आहे. जिल्ह्यातील 42 पैकी केवळ 7 केंद्रांवर आज 739 जणांनी लसीकरणचा पहिला डोस घेतला. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 157, रेल्वे हॉस्पिटल भुसावळ 154, वरणगाव ग्रामीण रुग्णालय 99, रोटरी क्लब जळगाव 137, पीएचसी 49 तर पीएमजेऐवाय प्रायव्हेट हॉस्पिटल येथे 135 असे एकूण 739 जणांना लसीकरण करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या