Thursday, April 25, 2024
Homeनगरकरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस तिलांजली !

करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस तिलांजली !

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोना लसीकरणासाठी नोंदणी (Registration for Corona Vaccination) जास्त तर प्रत्यक्ष लसीकरण (Vaccination) कमी, यामुळे उपलब्ध डोस (Dose) शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी करोनावर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा (Vaccination Campaign) हेतूला तिलांजली दिली जात असल्याचे वास्तव चित्र आहे. त्यामुळे लसीकरणाच्या पध्दतीत बदल करून आधी लसीकरण व नंतर नोंदणी केल्यास शासनास फसणिर्‍यांना चपराक बसेल.

- Advertisement -

अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District) हा करोनाचा केंद्रबिंदू होवू पाहत आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात मुबलक लस देण्याचे धोरण ठरवून मोठ्या प्रमणावर लसही उपलब्ध होत आहे. असे असले तरी पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण (Vaccination) होत नसल्याने डोस शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढले आहे. काही महिन्यांपूर्वी लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी, वादविवाद, पहाटेपासूनच्या रांगा अशी स्थिती होती. परंतू आता लोकांमधे लसीबाबत उदासीनता दिसून येत आहे.

त्यानंतर शहरात प्रभागानिहाय तर ग्रामीण भागात वाड्या वस्त्यानिहाय लसीकरण होवू लागले. परंतू सहजतेने डोस मिळू लागल्याने त्याकडे दुर्लक्ष (Ignore) होवू लागले. कदाचीत नागरिकांमधील करोनाची भीती कमी झाली असावी.

लसीकरणासाठी नोंदणीचे (Registration for vaccination) व प्रत्य़क्षलसीकरणानंतर प्रमाण हजारी 400 ते 500 असे आहे. नोंदणी करूनही अनेक जण लसीकरण करून घेत नसल्याने डोस शिल्लक राहण्याचे प्रमाणही मोठे आहे. ही तफावत भरून काढणे गरजेचे आहे. त्यात काही जण केवळ शासकीय कामात अडथळा नको म्हणून लसीकणाचे सर्टीफिकेट मिळविण्यासाठी लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) जावून केवळ नोंदणी करतात मात्र लस न घेताच निघून जातात. त्यामुळे नोंदणी व लसीकरण याचा हिशोब जुळत नसल्याचे अनेक केंद्रावर निदर्शनास येत आहे. हे लस न घेतलेले लोक भविष्यात करोना संक्रमणाची कारण ठरू शकतात. त्यामुळे आधी लसीकरण व नंतर नोंदणी असा बदल केला तर या गैरप्रकाराला आळा बसू शकेल.

सर्व नागरिकांचे लसीकरण झाले तरच सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. आणि संसर्गाचा धोका कमी होईल.आपल्या संपर्कातील नातेवाईक, मित्र, परिचित यांचे लसीकरण होईल ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लस उपलब्ध असताना अशा लोकांना लस घेण्यास प्रोत्साहन दिल्यास त्यांचे करोनाविरुध्दच्या लढाईत योगदान मोलाचे ठरेल.

शहराबरोबरच ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांनी लस घेतली असेल तरच तलाठी, ग्रामपंचायत, कृषी कार्यालयातील लाभ मिळेल. स्वस्त धान्य दुकानातील धान्य मिळेल. ज्या कुटुंबांनी, कुटुंब सदस्यांनी लस घेतली नसेल त्यांना सर्व शासकीय सेवा बंद कराव्यात, असा धाक प्रशासनाने दाखविला तरच 100 टक्के लसीकरण होईल. सर्व ग्रामपंचायत प्रशासनाने गावाच्या सुरक्षेची उपाययोजना म्हणून यासाठी आपापल्या स्तरावर निर्णय घेणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या