Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशCorona Update : भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत चढउतार सुरु, महाराष्ट्रातील स्थिती काय?

Corona Update : भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत चढउतार सुरु, महाराष्ट्रातील स्थिती काय?

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट आता बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे.

- Advertisement -

मात्र देशात गेल्या २४ तासात करोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढल्याने देशाची चिंता वाढली आहे. दिलासाजनक बाब म्हणजे करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण करोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा वाढत आहे. गेल्या २४ तासात आधीच्या दिवसाशी तुलना करता करोना बाधितांच्या संख्येत २ हजारांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार ७९२ नवे करोना रुग्ण आढळले असून ६२४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या ३ कोटी ०९ लाख ४६ हजार ०७४ इतकी झाली आहे.

तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख ११ हजार ४०८ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ४१ हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ कोटी ०१ लाख ०४ हजार ७२० वर पोहचली आहे. तसेच देशात सध्या ४ लाख २९ हजार ९४६ रुग्णांवर उपचार आहेत.

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत ३८ कोटी ७६ लाख ९७ हजार ९३५ जणांचं लसीकरण झालं आहे. मागील २४ तासांत ३७ लाख १४ हजार ४४१ जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)

राज्यात करोनाचे रुग्ण कमी होत असल्यामुळे दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र राज्यात दिसू लागलं आहे. राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या काल राज्यात ७ हजार २४३ नवे करोनाबाधित आढळले आहेत. हा आकडा सोमवारी ७ हजार ६०३ इतका होता. त्यामुळे नव्याने आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्याचं दिसून येत आहे. काल सापडलेल्या नव्या करोनाबाधितांच्या आकडेवारीनंतर महाराष्ट्रात एकूण करोनाबाधितांची संख्या आता ६१ लाख ६५ हजार ४०२ इतकी झाली आहे.

राज्यातल्या आजपर्यंतच्या एकूण करोनाबाधितांची संख्या जास्त दिसत असली, तरी त्यातले आजघडीला फक्त १ लाख ४ हजार ४०६ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच, ५९ लाख ३८ हजार ७३४ करोनाबाधित करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. गेल्या २४ तासांत करोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडा १० हजार ९७८ अर्थात इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट आज ९६.२१ टक्के इतका झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या