Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरराहाता तालुक्यात 264 नव्या करोनाबाधितांची नोंद

राहाता तालुक्यात 264 नव्या करोनाबाधितांची नोंद

राहाता (प्रतिनिधी)

राहाता तालुक्यात काल पुन्हा करोनाने आपला चढता आलेख कायम ठेवला असून काल 264 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. काल 257 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

- Advertisement -

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 21 खासगी रुग्णालयात 218 तर अँटीजन चाचणीत 25 रग्ण आढळून आले आहेत. तर 257 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

तालुक्यात अस्तगाव-12, राजुरी-01, ममदापूर-01, पिंपरी निर्मळ-03, एकरुखे-01, रांजणगाव-04, दाढ बुद्रुक-05, दुर्गा्पूर-03, चंद्रापूर-01, लोणी बुद्रुक-21, गोगलगाव-01, लोणी खुर्द-36, डोर्‍हाळे-05, नांदुर्खी बदु्रक-02, कोर्‍हाळे-03, वाळकी-01, केलवड बुद्रुक-02,साकुरी-06, आडगाव बुदु्रक-01, कोल्हार-26, बाभळेश्वर बुद्रुक-04, पाथरे-03, हनुमंतगाव-06, लोहगाव-01, सावळीविहिरी बुदु्रक-06, सावळीविहिर खुुर्द-07, निमगाव-08, निघोज-04, रुई-04, पिंपळवाडी-05, शिंगवे-06, वाकडी-08, चितळी-11, पुणतांबा-08, रस्तापूर-01 रांजणखोल-06, नांदूर बुदुक-01, असे 224 शिर्डी-22, राहाता-09, बाहेरील तालुक्यातील 09 असे एकूण 264 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

लोणी बुद्रुक व लोणी खुर्द येथे प्रत्येकी 21 व 36 अशी रुग्ण संख्या आहे. अस्तगाव-12, शिर्डी-22 कोल्हार-26 असे रुग्ण आढळून आले. बरे होण्याचे प्रमाण जरी होत असले तरी करोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी जास्त होतांना दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या