Friday, April 26, 2024
Homeनगरजिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच; आज २२३३ रुग्णांची नोंद

जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच; आज २२३३ रुग्णांची नोंद

अहमदनगर l Ahmednagar

जिल्ह्यात करोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. जिल्ह्यातील विविध तालुक्यात करोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय.

- Advertisement -

जिल्ह्यात गेल्या २४ तासात २ हजार २३३ नवे करोना रुग्ण आढळून आले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ८५९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५४९ आणि अँटीजेन चाचणीत ८२५ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती नवे रुग्ण?

नगर मनपा – ६११

कर्जत – २०१

संगमनेर – १९८

नगर ग्रामीण – १८७

अकोले – १२८

राहाता – ११७

पाथर्डी – ११४

राहुरी – १०७

शेवगाव – १०३

कोपरगाव – ९९

श्रीरामपूर – ७९

पारनेर – ७०

नेवासा – ५५

भिंगार कॉंटेन्मेन्ट – ५४

जामखेड – ४७

श्रीगोंदा – ४०

इतर जिल्हा – १७

मिलिटरी हॉस्पिटल – ६

- Advertisment -

ताज्या बातम्या