Monday, April 29, 2024
Homeनगरकरोना लढ्यासाठी नगर जिल्ह्याला 10 कोटी 81 लाखांचा निधी

करोना लढ्यासाठी नगर जिल्ह्याला 10 कोटी 81 लाखांचा निधी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजनांच्या दृष्टीने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून प्रथम हप्ता म्हणून सर्व विभागीय आयुक्तांना 176 कोटी 29 लाख 5 हजार रुपयांचा निधी अनेक जिल्ह्यांना वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यात नगर जिल्ह्याच्या वाट्याला 10 कोटी 81 लाख 85 हजार रुपयांचा निधी आला आहे. या निधीमुळे करोना लढ्याला आणखी वेग येणार आहे.

- Advertisement -

या निधीतून आरटीपीसीआर किट्स आणि व्हीटीएम किट्स न्यूनतम दराने खरेदी करता येणार आहे. तसेच औषधे घेता येणार आहेत. शासकीय, नगरपालिका, मनपा यांच्यासाठी लिक्वीड 02 टँक, ऑक्सिजन सिंलेडर, वैद्यकीय उपकरणे, साहित्य सामुग्री खरेदी करता येणार आहे.

नगर जिल्ह्यासह करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून निधी मागणीसाठी विविध जिल्हाधिकार्‍यांकडून प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्या प्रस्तावांची विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली छाननी करण्यात आली. त्यानुसार राज्य कार्यकारी समितीने 27 एप्रिल 2021 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी या निधी वितरणास मान्यता दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या