सिन्नरला आता घरपोच कोरोना टेस्ट

सिन्नर । Sinnar

मराठा उद्योजक लॉबीच्या सहकार्यातून सिन्नरमध्ये स्थापन झालेल्या घरपोच पॅथॉलॉजी व कोरोना स्वॅब टेस्टची अद्ययावत सेवा पुरविणार्‍या एआर लॅबडोअर या लॅबचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोणाच्या भीषण काळात कोविड स्वॅब कलेक्शन सेंटरची सिन्नर शहरात गरज होती. त्यात घरपोच कोविड स्वॅब घेण्याची अद्ययावत सुविधा उपलब्ध होणे. तेही शासनाने ठरवून दिलेल्या माफक दरात मिळणे हे सिन्नरकरांसाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे सिमंतीनी कोकाटे यांनी यावेळी म्हटले.

कोकाटे यांनी या कंपनीची संपूर्ण अद्ययावत कार्यप्रणाली समजून घेत त्याद्वारे सिन्नरकरांसाठी सुरु झालेल्या या विशेष सेवांचे कौतुक केले. तसेच ही सेवा समस्त सिन्नरवासियांना कोरोना काळात नक्कीच लाभदायक ठरेल.

विशेषतः सध्याच्या इमर्जन्सी काळात अथवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना कोविड स्वॅब देता येणे तसेच टेस्टची सर्व प्रक्रिया घरपोच मिळाल्याने पुढील निदानासाठी याची मदत होणार आहे. मराठा उद्योजक लॉबीच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या या संकल्पनेला तसेच कंपनीच्या सिन्नर शाखेला कोकाटे यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी एआर लॅबडोअर कंपनीचे डायरेक्टर राहुल निकम, अजय शेलार, चिंतेश्वर देवरे, सिन्नर ब्रँच ऑपरेशन हेड स्वप्नील काळे, वैभव डावरे, ऑपरेशन मॅनेजर अमोल सोनवणे आदी उपस्थित होते.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *