Thursday, April 25, 2024
Homeनगरकरोना नियम पाळून शहरात नाताळ उत्साहात

करोना नियम पाळून शहरात नाताळ उत्साहात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जेरूसलेम म्हणून ओळखले जाणार्‍या नगर शहरात शुक्रवारी नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला.

- Advertisement -

करोनाचे नियम पाळून ख्रिस्त बांधवांनी शहराच्या विविध चर्चमध्ये प्रार्थना केली. ह्यूम मेमोरियल चर्च व अहमदनगर पहिली मंडळी येथे ख्रिस्त बांधवांची गर्दी पहावयास मिळाली. प्रार्थनास्थळे ही मानवी जीवनात अध्यात्म, शांतता व जगण्याचा उत्साह वाढवणारे प्रेरणास्रोत असून या माध्यमातून सत्कर्म करण्याची भावना जागृत होते, प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण प्रेरणेतून आज समाज वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन रेव्हरंड विद्यासागर भोसले यांनी ह्यूम मेमोरियल चर्च येथील प्रार्थनेच्यावेळी केले.

नाताळनिमित्त आयोजित प्रार्थनेच्यावेळी सेक्रेटरी जॉन्सन शेक्सपीअर म्हणाले की, करोना विषाणू प्रादुर्भावामुळे आजच्या प्रार्थना कार्यक्रमात खबरदारी घेण्यात येत असून शासन निर्देशांचे पालन करण्यात आले आहे. प्रभू येशूंच्या शांततेच्या संदेशातून प्रेरणा घेऊन आज सर्व ख्रिस्ती बांधव नाताळ सण मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करीत आहेत.

आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. प्रभू येशूचा शांततेचा संदेश सम्रग विश्वासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी आ. जगताप यांनी सांगितले. ह्यूम मेमोरीयल चर्च येथील प्रार्थनेच्या वेळी रेव्हरंड विद्यासागर भोसले, रेव्हरंड पी. जी. मकासरे, सेक्रेटरी जॉन्सन शेक्सपिअर, एन. ए. जाधव, महेंद्र भोसले, मिलिंद भिंगारदिवे, फ्रँकलिन शेक्सपिअर व ख्रिस्ती समाजबांधव उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी अहमदनगर शहरातील बूथ हॉस्पिटल येथे भेट दिली. नाताळनिमित्त तेथील प्रशासन, आरोग्य अधिकारी, नर्सेस, इतर सर्व स्टाफ यांच्याशी संवाद साधला. करोनाच्या काळात हॉस्पिटलने बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले आणि नाताळनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी हॉस्पिटलच्यावतीने मेजर देवदत्त काळकुंबे यांनी त्यांचे स्वागत केले. निवासी उप जिल्हाधिकारी संदीप निचित यावेळी उपस्थित होते.

पहिली मंडळी (सी. एन. आय) चर्च येथे झालेल्या प्रार्थना सभेत रेव्हरंड जे. आर. वाघमारे यांनी प्रभू येशूच्या जन्मोत्सवानिमित्त ख्रिस्ती समाजात एकता, बंधूता व शांततेचा संदेश दिला. सामाजिक एकतेतून समाजातील वंचितांची सेवा करणे हीच प्रभू येशूची सेवा आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.

यावेळी रेव्ह. जे. आर वाघमारे, ले. लीडर. रन्नवरे, सेक्रेटरी मनस्विनी सोंतले, खजिनदार सॅम्युअल खरात, प्रसना शिंदे, अमोल लोंढे, अजित ठोकळ, तसेच पस्टरेत कमिटी, शाभाथ शाळा, ज्येष्ठ संघ, आणि मंडळीचे सभासद तसेच हर्षल जाधव, शमशोन शिंदे, ऋतिक चांदेकर, पीटर शिंदे, प्रथमेश शिंदे, स्मितिष जाधव, लुकस शिंदे, हर्षल पाटोळे, स्तवन साळवे, अहरव पतरे, मृदुल भोसले, जोएल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या