Tuesday, April 23, 2024
Homeजळगावजिल्ह्याचा रिकव्हरी रेट @ 89.92

जिल्ह्याचा रिकव्हरी रेट @ 89.92

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सप्टेंबर महिना प्रशासनासह आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी अतिशय धावपळीचा ठरला होता.

- Advertisement -

राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 12 हजार 477 कुटूंबांतील 34 लाख 81 हजार 169 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून यामध्ये 1 लाख 9 हजार 519 जुन्या विकारांचे (कोमॉर्बिड) रुग्ण आढळून आले आहे.

गत आठवडाभरात पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत कमालीची घट झाली असून तर कोरोना बाधीत रूग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याने जिल्हयात विविध कोविड केअर सेंटर, हॉस्पीटल रूग्णालयांत उपचाराअंती रूग्ण बरे होण्याचा दर 89.92 टक्क्यांवर पोहचला आहे तर मृत्यूदर देखिल 2.43 टक्क्यांपर्यंत आला आहे.

नागरिकांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत आरोग्य विभागाच्या तपासणीसाठी आलेल्या तपासणी कर्मचार्‍यांना आपल्या कुटूंबातील सदस्यांची योग्य माहिती देवून सहकार्य करावे.

या मोहिमेअंतर्गत संशयित रुग्णांची ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणांची तपासणी करण्यात येत आहे.

जिल्हा प्रशासनाला मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यात दिलासा मिळाला असला तरी नागरिकांची बेफिकिरी घातक ठरू शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या