करोनावर मात केलेल्या जमादाराचा मृत्यू; पोलीस दलात खळबळ

मालेगाव | प्रतिनिधी

करोना बाधित सिद्ध झाल्यानंतर यशस्वी उपचार करून करोनामुक्त झालेल्या जमादाराला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना या पोलीस जमादाराचे निधन झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या रुग्णाच्या घशातील स्राव नमुने घेत तपासणीला पाठविले आहेत. जिल्हा प्रशासनासह सर्वांच्याच नजरा आता या अहवालाकडे लागून आहेत.

करोनावर मात करत घरी परतुन अवघ्या  पाचच दिवसांनी जमादारांच्या मृत्यूने पोलीस यंत्रणेत चिंतेचे वातावरण पसरले आहे. येथील खाजगी रुग्णालयात आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

डॉक्टरांनी जमादार युनूस करीम शेख वय 55 यांचा मृत्यू श्वास घेण्यास त्रास होत होता. हृदयविकाराने झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे मात्र पाच दिवसापूर्वी शेख करोना वर मात करून परतले होते त्यामुळे त्यांच्या स्त्राव चे नमुने आज परत घेण्यात आले आहे

येथील शहर पोलीस ठाण्यात युनूस शेख कार्यरत होते 13 मे रोजी करोना सदृश्य लक्षणे दिसून त्रास होत असल्याने त्यांना प्रथम मालेगावी व नंतर नाशिक येथे अँपोलो रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

27 मेला त्यांचा अहवाल निगेटव्ह आल्याने घरी पाठवण्यात आले. मात्र आज सकाळी श्वास घेण्यास त्रास होऊन प्रकृती चिंताजनक झाल्याने शेख यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार होत असताना त्यांचे प्राणोत्क्रमण झाले त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले असा परिवार आहे या घटनेने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.