Saturday, April 27, 2024
Homeजळगावजिल्ह्यात आढळले करोना पॉझिटिव्ह २६८ रुग्ण

जिल्ह्यात आढळले करोना पॉझिटिव्ह २६८ रुग्ण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह 268 रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 9451 झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

- Advertisement -

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 78, जळगाव ग्रामीणमधील 22, भुसावळ येथील 20, अमळनेरातील 8, चोपडा येथील 42, पाचोर्‍यातील 7, भडगावमधील 19, धरणगावातील 7, यावल येथील 8, जामनेरातील 8, रावेर येथील 15, पारोळ्यातील 2, चाळीसगाव येथील 23, मुक्ताईनगरातील 6, बोदवड 2 आणि परजिल्ह्यातील एका रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 6043 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यात 209 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात सध्या 2948 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विविध ठिकाणचे एकूण 10 रुग्ण दगावले. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात 5 रुग्ण, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात 4 रुग्णांचा मृत्यू झाला तर एका रुग्णाचा मृत्यू गोल्ड सीटी हॉस्पिटल मध्ये झाला आहे.

मृतांमध्ये जामनेर तालुक्यातील 60वर्षीय पुरुष व 52 व 60 वर्षीय महिला, जळगाव तालुक्यातील 48 व 62 वर्षीय महिला, एरंडोल तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, यावल तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यातील 82 वर्षीय पुरुष, धरणगाव तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष व मुक्ताईनगर तालुक्यातील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या