Friday, April 26, 2024
Homeनाशिककरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना संदर्भातील स्थिती बदलल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

महापालिकेकडुन शहरात करोनाचा संसर्ग रोकण्यासाठी वाढविलेल्या अँटीजेन – करोना चाचण्या, मिशन झिरो अंतर्गत शहरात 20 मोबाईल डिस्पेन्सरी, आता 25 फिव्हर क्लिनीक मार्फत सुरू झालेली आरोग्य तपासणी व अ‍ॅटीजेन चाचणी यांचे चांगले परिणाम दिसुन येत आहे. यामुळेच आता दाखल रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यापर्यत गेले आहे. या करोना संदर्भातील स्थिती बदलल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात आता करोना संक्रमण अद्याप सुरूच असुन जुलै महिन्यात प्रति दिन सुमारे 200 च्या वर नवीन रुग्ण समोर आल्यानंतर ऑगस्ट महिन्यात सरासरी रुग्णांची संख्या 400 – 500 पर्यत गेली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रतिदिन नवीन रुग्णांचा आकडा 700 ते 800 पर्यत गेला. नंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रतितदिन 1 हजार नवीन रुग्ण समोर आले होते.

गेल्या पाच सहा दिवसात हा नवीन रुग्ण प्रतिदिन 500 – 600 पर्यत आल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाढत्या संसर्गामुळे महापालिकेकडुन करोना अँटीजेन चाचणी 2500 पर्यत वाढविण्यात आल्या आहे. परिणामी रुग्णांचा आकडा वाढला असला तरी संसर्ग रोकण्यात महापालिकेला यश येत आहे. या चाचण्या वाढविण्यात आल्याने बाधीत रुग्णांला तात्काळ विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. तर बाधीतांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या लोकांना बाजुला करण्यात येऊन प्रादुर्भाव रोकण्याचे काम केले जात आहे. परिणामी या नवीन बाधीत रुग्णांपासुन होणारा संसर्ग टाळण्यात महापालिकेला मोठे यश मिळत आहे.

महापालिकेकडुन कोविड रुग्णांवर आणि संशयित रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार केले जात आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जुलै अखेर 60 टक्क्यावरुन ऑगस्ट महिन्यात 77 टक्कयापर्यत गेले होते. आता 6 आक्टोंबर 2020 पर्यत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यापर्यत गेले आहे. आता महापालिका क्षेत्रातून एकुण 55हजार 77 रुग्णांपैकी 50 हजार 9 रुग्ण बरे झाले आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या