Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशCorona Update : देशात करोना पुन्हा डोकं वर काढतोय, २४ तासांत आढळले...

Corona Update : देशात करोना पुन्हा डोकं वर काढतोय, २४ तासांत आढळले ‘इतके’ रुग्ण

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारतात पुन्हा एकदा करोनाने (Corona) थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 134 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी दि. 19 मार्च रोजी 1 हजार 71 प्रकरणे नोंदवली गेली होती…

- Advertisement -

देशात आता करोनाचे सक्रिय रुग्ण 7 हजार 26 वर पोहोचले आहेत. आतापर्यंत देशात करोनाचे 4 कोटी 46 लाख 98 हजार 118 रुग्ण आढळले आहेत. करोनामुळे गेल्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र आणि केरळमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 30 हजार 813 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात करोना लसीचे 220.64 कोटी पेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ओशो आश्रम राडा प्रकरणी १२० अनुयायांविरोधात गुन्हा दाखल

102.73 कोटींहून अधिक लोकांना पहिला डोस मिळाला आहे. याशिवाय 95.19 कोटी पेक्षा जास्त दुसरा डोस देण्यात आला आहे. यासोबतच 22.71 कोटींहून अधिक लोकांना खबरदारीचा डोसदेखील देण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे विधानभवनात एकत्र

- Advertisment -

ताज्या बातम्या