Wednesday, May 8, 2024
Homeनगर24 तासांत करोना मृतांची आकडेवारी द्या

24 तासांत करोना मृतांची आकडेवारी द्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात करोनामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. मात्र, मृत्यूदर कमी दाखवला जातोय, असा आरोप करीत

- Advertisement -

काँग्रेसचे माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील त्रिंबके, सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख यांच्यासह इतरांनी मंगळवारी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान, महानगरपालिका आयुक्तांनी या आंदोलनाची तीव्र दखल घेत मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी आंदोलनकर्त्यांना 24 तासांत माहिती सादर करावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशाराच दिला आहे.

जिल्ह्यात करोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृत्यूचे प्रमाण हे जास्त आहे. मात्र, प्रशासन मृत्यूदर कमी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. अधिकारी खरी आकडेवारी झाकून शाबासकी मिळवण्यासाठी मृत्यूदर कमी दाखवत आहेत, असा गंभीर आरोप निखील वारे, बाळासाहेब पवार, सुनील त्रिंबके यांनी यावेळी केला.

जिल्ह्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच आता करोनामुळे मृत्यू होणार्‍यांची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. दोन आठवड्यांपूर्वी माजी नगरसेवक वारे व पवार यांनी नगरच्या अमरधाममधून किती करोना बाधितांवर अंत्यसंस्कार केले, याची माहिती घेतली होती.

तेव्हा अमरधाममधून देण्यात आलेली आकडेवारी व प्रशासनाकडील आकडेवारी यामध्ये मोठी तफावत होती. तेव्हापासून सातत्याने करोनामुळे होणार्‍या मृत्यूची खरी आकडेवारी द्या, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात येत होती.

मात्र, सातत्याने टाळाटाळ करण्यात आल्याने अखेर मंगळवारी (दि. 15) महापालिका आयुक्त मायकलवार यांच्या दालनात वारे, पवार यांच्यासह ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाकडून देण्यात येणार्‍या करोना बाधितांच्या मृत्यूच्या आकडेवारीवरून गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या