Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशकात करोनाचा मृत्यूदर 1.41 टक्के

नाशकात करोनाचा मृत्यूदर 1.41 टक्के

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक महापालिका क्षेत्रात करोना संक्रमणाचा वेगात लक्षणिय घट झाली असून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस प्रतिदिन नवीन रुग्णांची संख्या 1000 वर गेली असताना आता ती ही संख्या 200 च्या आत आली आहे.

- Advertisement -

मागील महिन्याच्या तुलनेत मृत्यूदर घटला असून आता तो 1.41 टक्के इतका झाला आहे. दरम्यान सरासरी मृत्यूचे प्रमाण हे 4 ते 5 पर्यंत आले असल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिक शहरातील करोनाचा संसर्गाचे प्रमाणात ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढले जाऊन प्रतिदिन 1 हजारापासून तेराशेपर्यंत नवीन रुग्ण समोर येत होते. तसेच मृतांचा आकडा देखील मोठ्या प्रमाणात वाढला गेला होता. आता ऑक्टोबरपासून नवीन रुग्णांचा आणि मृताच्या आकडेवारीत घट झाली आहे.

शहरात आजपर्यंत 60 हजार 780 पर्यंत करोना रुग्ण गेले असून मृतांचा आकडा 853 च्यावर गेला आहे. असे असले तरी मात्र गेल्या काही दिवसांत नवीन रुग्णांचा आकडा 1 हजारावरून घटून 200 ते 300 पर्यंत येऊन ठेपला आहे.

तसेच मृत्यूचे प्रमाण घटले आहे. तसेच प्रतिदिन मृत्यू हे 7 ते 8 पर्यंत असताना आता हे प्रमाण 4 ते 5 पर्यंत आले आहे. गेल्या दोन दिवसांत तर नवीन करोना रुग्णांचा आकडा 200 च्या आत आला आहे. यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या जुलै महिन्यात नवीन रुग्णांचा आकडा 200 च्या आत होता, तसेच काहीसे चित्र आता ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात दिसून येत आहे.

महापालिका प्रशासनाकडून वाढता संसर्ग रोकण्यासाठी गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात शहरात आरोग्य सर्व्हेचे काम डॉक्टरांची पथके वाढवून करण्यात आला. तसेच अँटिजेन चाचण्या वाढविण्यात आल्यानंतर आता दररोज अँटिजेन व करोना चाचण्या 3 हजारांपर्यंत नेण्यात आल्या होत्या.

शहरातील कोमआर्बिड वृद्ध व्यक्तींचा सर्व्हे करण्यात येऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच फिव्हर क्लिनीक व माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम यामुळे संक्रमणाला ब्रेक लावण्यात महापालिकेला यश आले आहे. या एकूणच उपाय योजनांमुळे मृत्यूदर घटला आहे.

नाशिक महापालिकेतील करोना स्थिती

दि. 6 ते 30एप्रिल रुग्ण 10 मृत्यू 0 बरे 3 मृत्यूदर 0%

1 ते 31 मे 204 8 63 3.92

1 ते 30 जून 1958 97 865 4.81

1 ते 31 जुलै 9411 275 6986 2.92

1 ते 31 ऑगस्ट 25451 491 20135 1.92

1 ते 30 सप्टेंबर 51472 738 47216 1.43

1 ते 25 ऑक्टोबर 60780 853 56848 1.41

- Advertisment -

ताज्या बातम्या