Saturday, April 27, 2024
Homeनगरकरोना उपाययोजनांंसाठी नोडल अधिकार्‍यांच्या नियुक्त्या

करोना उपाययोजनांंसाठी नोडल अधिकार्‍यांच्या नियुक्त्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात करोना संसर्गाचा कहर रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असून त्याअनुषंगाने

- Advertisement -

आता विविध जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या उपजिल्हाधिकारी यांच्या नोडल अधिकारी म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत.

उपजिल्हाधिकारी, भूसंपादन जयश्री आव्हाड यांच्याकडे करोनाच्या अनुषंगाने येणार्‍या तक्रारी (मेडिकल बिल वगळून) यांचे निराकरण करणे, जिल्हाधिकारी कार्यालय आणि वृत्तपत्रात येणार्‍या तक्रारींचा संबंधित विभागाकडून खुलासा मागविणे, येणारे खुलासे जिल्हाधिकारी यांना सादर करणे आणि पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांना महसूल शाखेच्या तहसीलदार माधुरी आंधळे सहायक अधिकारी म्हणून मदत करणार आहेत.

पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी माधुरी निर्मळ यांच्याकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोव्हिड उपचारापोटी आकारण्यात येणार्‍या बिलांच्या तक्रारीचे निवारण करणे, प्राप्त बिलाच्या तक्रारीनुसार तालुकास्तरीय समितीकडून बिलाची तपासणी करून संबंधित रुग्णालयाकडून खुलासा घेणे आणि तपासणी समितीच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करणे, अतिरिक्त रक्कम संबंधित रुग्णालयाकडून वसूल करणे आदी कामे राहणार आहेत. त्यांना सामान्य प्रशासन विभागाचे नायब तहसीलदार सी.ई. चौधरी सहाय्यक अधिकारी आहेत.

भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडे केंद्र आणि राज्य सरकारकडून येणारी परिपत्रके, आदेश, अर्धशासकीय पत्र तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाकडून येणारे परिपत्रक, अर्धशासकीय पत्रांवर कार्यवाही करणे, तसेच करण्यात येणारे पत्रव्यवहार जिल्हाधिकारी यांच्या अवलोकांनार्थ सादर करणे, करोना संदर्भाविविध शासकीय विभागांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय क्षेत्रिय यंत्रणांना तात्काळ पाठविणे, त्यांना पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक आर.जी. राऊत, सहायक अधिकारी म्हणून मदत करणार आहेत.

निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे करोना अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन शाखा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष 24 ताास कार्यरत ठेवणे. नियंत्रण कक्षात येणार्‍या तक्रारी नोंदवून संबंधित विभागाशी समन्वय ठेवून सोडविणे, विविध स्वयंसेवी संस्था व नागरिक प्रशासनास सुचविलेले प्रश्न आणि उपाययोजनांचे संकलन करणे, प्राप्त होणार्‍या तक्रारी व अडचणीबाबत जिल्हाधिकार्‍यांना अवगत करणे आदी कामे राहणार आहेत. त्यांना उपजिल्हाधिकारी भूसंपादन सिध्दार्थ भंडारे सहायक करणार आहेत.

उपजिल्हाधिकारी रोहिणी नेर्‍हे यांच्याकडे करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन करणार्‍यांवर करण्यात येणार्‍या कारवाईचे संनियंत्रण करणे, मास्क न घालणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, सामाजिक अंतराचे नियम न पाळणार्‍या व्यक्ती, आस्थापनांवर केलेल्या कारवाईची दैनदिन माहिती संकलित करणे तसेच ही माहिती शासनाच्या अ‍ॅपवर दैनदिन भरणे, आरोग्य विभागाच्या समन्वयाने करोनाविषयक माहितीची प्रसार माध्यमातून जनजागृती करणे, करोना कालवधीत मदत कार्य करू इच्छिणार्‍या सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून मदत साहित्य, इतर साधन सामुग्री गरजुंपर्यंत पोहचविणे आदी कामे राहणार आहेत.

त्यांना गृह शाखेचे नायब तहसीलदार राजू दिवाण सहाय्य करणार आहेत. तर जिल्ह्यात कोव्हिडच्या अनुषंगाने लागणार्‍या औषधांची बाजारातील उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाची समन्वय ठेवून खातरजमा करणे, जिल्ह्यात कोव्हिड औषधांचा तुटवडा जाणवणार नाही, यासाठी योग्य नियोजन करणे, जिल्ह्यातील संस्थांमधील कोव्हिड औषधांबाबत तालुका आरोग्य अधिकारी समन्वय ठेवून कमरता असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क साधून औषधे उपलब्ध करून देणे, औषध विक्रेते मास्क, सॅनिटाझरची जादा दराने विक्री अथवा औषधांची साठेबाजी करत असल्यास अन्न व औषध विभागाच्या मदतीने कारवाई करायची जबाबदारी सहायक पुरवठा अधिकारी किशोर कदम यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या