Saturday, May 11, 2024
Homeजळगावकरोना पुन्हा काढतोय डोके वर

करोना पुन्हा काढतोय डोके वर

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या सहा सात महिन्यांपासून दररोज शेकडोंच्या संख्येंने भर पडणार्‍या कोविड रुग्णांचे प्रमाण प्रशासनाच्या अथक प्रयत्नातून आटोक्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

करोनाबाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट 96.93 टक्क्यावर असला तरी मृत्यूदर सुद्धा 2.38 टक्क्यांवर कायम आहे.

नोव्हेंबर महिन्यात तिसर्‍या सप्तात दि.21 अखेर 795 करोनाबाधितांची संख्या आढळली असून 21 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

तर दुसरीकडे रूग्ण वाढीचे प्रमाण पुन्हा वाढून 60 ते 68 वर गेल्याने आटोक्यात असलेला कोरोना पुन्हा दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी प्रशासन स्तरावर आवश्यक उपाय योजनांसह सज्ज आहे. मात्र नागरिकांनीही त्यांची जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या