Thursday, April 25, 2024
Homeनगरकरोना संक्रमितांची संख्या वाढल्याने सोनईकर चिंतेत

करोना संक्रमितांची संख्या वाढल्याने सोनईकर चिंतेत

सोनई |वर्ताहर| Sonai

सोनई (sonai) येथे करोना संक्रमितांच्या (Corona infected) संख्येत चढ-उतार सुरू असून बुधवारी एकाच दिवशी 15 संक्रमित आढळून आल्याने काल गुरुवारी सोनई पोलीस ठाण्याच्यावतीने (Sonai Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे (Assistant Inspector of Police Ramchandra Karpe) यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वनिक्षेपकावरून चौका चौकात शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या. रुग्णसंख्या वाढली तर गावात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) होण्याची चिंता व्यावसायिकांना लागली आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) यांनी नगर जिल्ह्यातील करोना संक्रमितांच्या वाढत असलेल्या संख्येच्या परिस्थितीवर बैठक (Meeting) घेऊन कडक कारवाईच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. सोनईत (Sonai) बुधवारी एकाच दिवशी 15 करोना संक्रमित सापडले असल्याने ग्रामस्थांत चिंता वाढली आहे. ग्रामस्थ, व्यापारी विनामास्क फिरत असून नियम पाळत नसल्याने गर्दी वाढत आहे.

गुरुवारी बसस्थानक, शिवाजी चौक, संभाजी चौक, महावीर पेठ, स्वामी विवेकानंद चौक व परिसरात पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरून सूचनांचे पालन करण्याच्या सूचना देत नियम न पाळणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची सक्त ताकीद दिली. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी शिस्त न पाळल्यास संसर्ग वाढू शकतो. पुन्हा निर्बंध लागू शकतो. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही कर्पे यांनी केले. कापड दुकान, किराणा व भाजीपाला विक्रीच्या ठिकाणी सर्व नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसले. दरम्यान काल गुरुवारी सोनई येथे दोघे करोना संक्रमित आढळून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या