Thursday, April 25, 2024
Homeनगरसक्षम आरोग्य व्यवस्थेमुळे करोना संसर्ग नियंत्रणात : आ. आशुतोष काळे

सक्षम आरोग्य व्यवस्थेमुळे करोना संसर्ग नियंत्रणात : आ. आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

करोना संसर्ग रोखण्यासाठी वेळेत केलेल्या उपाययोजनांमुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षमपणे संकटाचा मुकाबला करू शकली. सक्षम आरोग्य व्यवस्थेमुळे तालुक्यात करोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.

- Advertisement -

आ. काळे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यातील चासनळी येथे सर्वसुविधांयुक्त 3 कोटी रुपयांची इमारत बांधण्यात आली आहे. चासनळी प्राथमिक आरोग्य केद्राला जिल्हा परिषदेकडून नुकतीच रुग्णवाहिका देण्यात आली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते म्हणाले, चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यात येणार्‍या अडचणी नूतन इमारतीमुळे दूर झाल्या असून रुग्णवाहिका मिळाल्यामुळे नागरिकांना वेळेत उपचार मिळणे शक्य होणार आहे.

त्यामुळे रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा कशी मिळेल यावर आरोग्य कर्मचार्‍यांनी भर द्यावा. रुग्णांना आरोग्य सेवा देतांना अजूनही काही अडचणी असतील तर त्या अडचणी बिनदिक्कतपणे सांगा त्या अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यावेळी सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सचिन चांदगुडे, पंचायत समिती सदस्य अनिल कदम, मधुकर टेके, जिनिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, राहुल रोहमारे, धरमचंद बागरेचा, सुनील गंगूले, सुनील शिलेदार, दिलीप चांदगुडे, सुनील गाडे, संदीप जाधव, प्रशांत वाबळे, दिलीप दाणे, बाबासाहेब शिंदे, राहुल जगधने, नारायण होन, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, डॉ. सुनील मोरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या