बोदवड :करोना बाधित डॉक्टरवर गुन्हा दाखल

jalgaon-digital
1 Min Read

बोदवड – प्रतिनिधी

शहरातील शालिमार टॉकीज परिसरात राहत असलेले एक खासगी डॉक्टरांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले होते व दि.२५ जूनला त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता, तर २६ रोजी त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव आला.

या कालावधीत दि.२६ ते २७ जून दरम्यान त्यांनी नाडगाव येथे रुग्णांची तपासणी केली होती. त्यामुळे या करोना बाधित खाजगी डॉक्टरांच्या संपर्कात आल्याने अनेक रुग्णांचा करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने याप्रकरणी तहसीलदार हेमंत पाटील यांच्या फिर्यादीवरून संबंधित डॉक्टर विरूध्द दि.१ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस संजय भोसले करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *