Friday, April 26, 2024
Homeनाशिकमालेगावमध्ये आणखी ८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९९; मृतांची संख्या ६...

मालेगावमध्ये आणखी ८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९९; मृतांची संख्या ६ वर

नाशिक | प्रतिनिधी 

मालेगावमध्ये आज सायंकाळी आलेल्या अहवालानंतर आणखी ८ रुग्णांचे रिपोर्ट कोरना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे एकट्या मालेगावमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८५  पोहोचली आहे. तर मालेगावमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९९ वर पोहोचली आहे.

- Advertisement -

मालेगावमध्ये आज एकूण ३८ अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये ८ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर इतर ३० रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. तर नाशिक सिव्हीलमधील १९ अहवाल आज निगेटिव्ह आले आहेत. आजच्या वाढलेल्या आकड्यांमुळे मालेगावसह जिल्ह्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मालेगावी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये आज मोतीबाग नका परिसरातील दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. यामध्ये एक ३५ वर्षांचा तर दुसरा पुरुष ५० वर्षांचा आहे. तर ३१ वर्षीय महिलेचा यात समावेश आहे.

संजय गांधी नगर परिसरातील एक ३५ वर्षीय महिला आहे. इस्लाम पुरा परिसरातील एक ६० वर्षीय वृद्धा बाधित आढळून आली आहे. जाधव नगरमधील ४८ वर्षीय प्रौढ ब्बाधित आढळून आला आहे.  तर हजार खोली परिसरातील ३१ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच नयापुरा भागातील एका १३ वर्षीय मुलीलादेखील कोरोनाची लागण झाली आहे.

रात्रीच्या अहवालात मालेगावचे 8 पाँजिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील करोना ग्रस्तांची संख्या शतकाच्या उंभरठ्यवर 99 झाली आहे.शनिवारी (ता. 18) रात्री मालेगावचे जे 10 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते, त्यात आधीच मृत झालेले दोघे कोरोना संशयितांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मृतांचा आकडा 6 झाला आहे.

जिल्ह्यात रविवारी (दि.१९) नव्याने 14 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 2 जिल्हा रुग्णालय, 8 डाॅ. जाकीर हुसेन रुग्णालय व चौघे मालेगाव मनपा रुग्रालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, शनिवारी (दि.१८) रात्री मालेगाव येथील 10 रुग्णांचे अहवाल मिळाले. त्यातील दोघांचा उपचारादरम्यान आधीच मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची जिल्ह्यातील संख्या सहा झाली आहे.

शनिवारी जिल्ह्यात 21 काेरोनाबाधीत रुग्ण आढळले. त्यातील पाच जण नाशिक शहर, एक सिन्नरचा तर पंधरा मालेगाव येथील रुग्ण होते. मालेगाव येथील प्राप्त अहवालांमध्ये दोघांचा आधीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, रविवारी जिल्ह्याचे 52 अहवाल प्राप्त झाले. यात 8 मालेगावचे 8 पाँजिटिव्ह आहेत.

तर आज 14 संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे याआधीचेही 213 अहवाल प्रलंबित आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत 892 अहवालांपैकी 99 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर 585 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझिटीव्ह अहवालांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून ते सहाही नागरिक मालेगाव येथील होते. तसेच जिल्ह्यात 84 कोरोना बाधीतांवर रुग्णांलयामध्ये उपचार सुरु आहेत.

एकूण कोरोना बाधित: 99
मालेगाव : 85
नाशिक शहर : 10
उर्वरित जिल्हा : 4
उपचार सुरु : 84
एकूण मयत : 6
कोरोनमुक्त : 1

- Advertisment -

ताज्या बातम्या