महिनाभरात अवघ्या आठ शाळा वाढल्या

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनामुक्त गावांमध्ये (Corona Free Village) आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग (Class) सुरू करण्याच्या निर्णयानंतर (Decision) जिल्ह्यात (District) पहिल्या15 दिवसांत 194 शाळा सुरू (School Start) झाल्या होत्या. मात्र, सध्या करोना (Covid 19) कमी होत असतांना जिल्ह्यातील (District) अवघ्या आठ शाळा (School) नव्याने सुरू होवू शकलेल्या आहेत. जुलैअखेर जिल्ह्यात 194 शाळा सुरू होत्या. त्यात महिनाभरात अवघ्या आठ शाळांची भर पडलेली आहे. सुरू असणार्‍या शाळांमध्ये 17 हजार 347 विद्यार्थी उपस्थितीत आहेत.

राज्य सरकारने (Maharashtra Government) करोनाची स्थिती (Corona condition) काहीशी आटोक्यात आल्यानंतर करोनामुक्त गावांमध्ये (Corona Free Village) शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. परंतु, शाळा सुरू करताना शिक्षकांनी करोना चाचणी (Corona test by teachers) करणे अनिवार्य (Mandatory) केले होते. जिल्ह्यात (District) 15 जुलै रोजी शाळा सुरू झाल्या. 16 जुलैला 149 शाळा सुरू झाल्या. ही संख्या 30 जुलैअखेर 194 झाली होती. त्यावेळी 16 हजार 80 विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती होती.

मात्र, आता करोना बर्‍यापैकी नियंत्रणात (Control) येत असतांनाही महिना भरात नव्याने सुरू होणार्‍या शाळांची संख्या आठने वाढत जिल्ह्यात सध्या 202 शाळा सुरू झालेल्या आहेत. जिल्ह्यात आठवी ते बारावी एकूण 1 हजार 242 शाळा आहेत. त्यात 85 जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) व 1 हजार 157 इतर व्यवस्थापन शाळांचा समावेश आहे. आतापर्यंत 202 शाळा सुरू झाल्या असून इतर गावांतील शाळा कधी सुरू होणार? त्यांना कधी परवानगी मिळणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

3 हजार 337 शिक्षकांचे लसीकरण

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 47 तर अन्य व्यवस्थापनाच्या शाळांमधील 3 हजार 337 शिक्षकांचे लसीकरण करण्यात आलेले आहेत. 5 सप्टेंबरच्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षकांचे लसीकरण प्राधान्यांने करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिलेले असल्याने जिल्ह्यात शिक्षकांच्या लसीकरणाचा वेग वाढणार आहे.

सुरू असणार्‍या शाळा कंसात माध्यमिक

अकोले 2 (41), संगमनेर 0 (27), कोपरगाव 3 (1), राहाता 5 (28), राहुरी 1 (7), श्रीरामपूर 0 (21), नेवासा 2 (14), शेवगाव 1 (11), पाथर्डी 0 (11), जामखेड 1 (2), कर्जत 0 (6), श्रीगोंदा 0 (4), पारनेर 0 (6), नगर 0 (8) असे आहेत.

आठवी ते बारावी एकूण शाळा – 1242

सध्या सुरू असलेल्या शाळा – 202

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *