Saturday, April 27, 2024
Homeनाशिकएसटी कर्मचाऱ्यांमध्ये ‘कराेना भिती’

एसटी कर्मचाऱ्यांमध्ये ‘कराेना भिती’

नाशिक | Nashik

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून मुंबईत बससेवा देण्यासाठी नाशिकमधून गेलेल्या वाहक आणि चालकांना करोनाची लागण होण्याचा धोका वाढला आहे.

- Advertisement -

येवला, नांदगाव आणि शहरातील डेपो क्रमांक एकमधील कर्मचाऱ्यारी करोनाच्या विळख्या सापडल्याचे समजते आहे.

यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना त्यांना करोनाशी सामाना करावा लागत असून, कराेनाचा हा ताप कसा थांबविणार, असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना पडला आहे.

मागील काही महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या चालक, वाहक या कर्मचाऱ्यांना मुंबईत बेस्टच्या सेवेसाठी पाठवले जात आहेत. नाशिकमधून किमान साडेचारशे कर्मचारी सध्या मुंबईत सेवा देण्यासाठी हजर आहेत.

सेवा देऊन परत येणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी काहींना मात्र करोनाची लागण झाली आहे. येवल्यातील १६, नांदगावमधील सात तर डेपो क्रमांक एकमधील सहा कर्मचाऱ्यांना याचा त्रास झाला आहे.

एकीकडे शहरात करोनाचे प्रमाण घटत असताना दुसरीकडे या आयात करोनाचा प्रसार वाढत असल्याबाबत कोणसाही चिंता नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. मुंबईत काम करण्यास कर्मचाऱ्यांची ना नाही. मात्र, सुविधांचा अभाव आहे. त्याचा फटका मुळातच आर्थिक परिस्थितीशी दोन हात करणाऱ्यांना बसतो आहे.

याबद्दल मंत्री, लाेकप्रतिनिधी व महामंडळ प्रशासनाने याेग्य कारवाई करून कर्मचाऱ्यांकडे लक्ष्य द्यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या