Sunday, May 5, 2024
Homeनाशिकदिलासादायक : करोना मृत्यूदर घटला; २४ तासात ३ रूग्णांचा मृत्यू

दिलासादायक : करोना मृत्यूदर घटला; २४ तासात ३ रूग्णांचा मृत्यू

नाशिक । Nashik

शहर तसेच जिल्ह्यात प्रादुर्भाव कमी होत असून मागील चोवीस तासात 434 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा जास्त 559 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोनावर मात करणारांचा आकडा 82 हजार वर पोहचला आहे.

- Advertisement -

मागील आठ दिवसात जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह येणारांची संख्या घटली आहे. तर करोनामुक्त होणारांचे प्रमाण वाढत आहे. जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार मागील 24 तासात 434 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील 308 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 59 हजार 849 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 111 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 25 हजार 493 झाला आहे. मालेगावत दिवसभरात 10 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 4 हजार 51 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 677 झाला आहे.

दुसरीकडे करोनावर मात करणार्‍या रूग्णांमध्येही दिवसेंदिवसे वाढ होत आहे. 24 तासात जिल्ह्यातील 559 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 81 हजार 937 झाला आहे.

करोनामृत्यूमध्येही घट झाली असून दिवसभरात केवळ रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये ग्रामिण भागातील 2 व मालेगाव येथील 1 रूग्णांचा सामावेश आहे.

यात नाशिक शहरातील एकही रूग्ण नाही. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 1 हजार 613 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा घटत चालला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 90,070

* नाशिक : 59,849

* मालेगाव : 4,051

* उर्वरित जिल्हा : 25,493

* जिल्हा बाह्य : 677

* एकूण मृत्यू : 1,613

* करोनामुक्त : 81,937

- Advertisment -

ताज्या बातम्या