करोनाने खरंच भिकेला लावले…; काय म्हणते राजधानीतील सर्वेक्षण?

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली | New Delhi

करोनाने (Corona) भिकेला लावले, असे वाक्य आपण चर्चेत अनेकदा ऐकले असेल. पण या करोनाच्या संकटाने (Corona Crisis India) भारतात अनेकांना वास्तवात भिकेला लावल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. देशाच्या राजधानीत (Delhi) झालेल्या एका सर्वेक्षणात छोटी-मोठी नोकरी करणारे आता जगण्यासाठी भिक मागू लागल्याचे दिसून आले आहे.

फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन डेव्हलपमेंटने (Institute for Human Development) हा अभ्यास केला. अंतिम मसुदा अहवाल दिल्ली सरकारच्या समाजकल्याण विभागाला (Department of Social Welfare Delhi) सादर करण्यात आला. त्याची आता तपासणी करण्यात येत आहे. दिल्लीत सर्वेक्षण केलेल्या बहुतेक लोकांना दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता आणि म्हातारपण, अपंगत्व आणि रोग यासारख्या कारणांमुळे भीक मागावी लागत आहे. मात्र करोनाच्या लॉकडाऊनमुळे (Corona Lockdown) रोजगार-नोकरी गमावणार्‍यांनाही आता भीक मागावी लागत असल्याचे समोर आले आहे, असे इंडियन एक्सप्रेस इंग्रजी दैनिकाने दिले आहे.

रस्त्यावर भीक मागताना आढळलेल्यांपैकी काही बांधकाम मजूर, घरगुती नोकर, रस्त्यावरील विक्रेते आणि रिक्षाचालक होते. त्यापैकी काहींचे छोटे व्यवसाय होते किंवा ते कमी पगाराच्या आणि तात्पुरत्या नोकर्‍यांमध्ये काम करत होते.

200 ते 500

20 हजारांवर भिकार्‍यांचे सर्वेक्षण झाले. 65 टक्के भिकार्‍यांना दररोज 200 रुपयांपेक्षा कमी मिळतात. 23 टक्के दिवसाला 200 ते 500 रुपये कमावतात. 55 टक्के बेघर होते तर 45 टक्के झोपडपट्टीत वा अन्य वसाहतीत राहतात.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *